शिवसेनेच्या (Shiv sena Politics) दसरा मेळावा तयारीच्या बैठकीत राडा झाल्याचं वृत्त समोर आलंय. शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि युवा सेनेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. रामदास कदम यांचे सुपुत्र सिद्धेश कदम (Siddhesh Ramdas Kadam) हे अजूनही युवासेनेच्या पदावर कसे, असा प्रश्न विभाग प्रमुखांनी बैठकीत उपस्थित केला. वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांना विभाग प्रमुखांनी जाब विचारल्यानंतर या बैठकीतलं वातावरण तापलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
मुंबईत विभाग प्रमुख आणि सचिवांची सोमवारी बैठक पार पडली. ठाकरे गटाच्या शिवसेना दसरा मेळाव्याच्या तयारीच्या निमित्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं. सोमवारु दुपारी झालेल्या या बैठकीत राडा झाला.
युवा सेना सचिव वरुन सरदेसाई आणि शिवसेना सचिवा सूरज चव्हाण यांना विभाग प्रमुख यांनी सिद्धेश रामदास कदम यांच्यावरुन जाब विचारला. विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे आणि आमदार विलात पोतनीस यांनी हा जाब विचारला होता.
रामदास कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली, मात्र त्यांचा मुलगा सिद्धेश कदम हे अजूनही युवा सेनेच्या पदावर कसे काय? त्यांची हकालपट्टी अजून का करण्यात आली नाही?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सिद्धेश कदम अजूनही युवा सेनेच्या पदावर असून ते विभागात वावरत आहेत, असा आरोप सुर्वे आणि विलास पोतनीस यांनी केला. सोमवारी दुपारी बैठक सुरू होताच हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर बैठकीची सुरवातीची 20 मिनिटं या मुद्द्यावरुन मोठा वादंग झाला.
पक्षाचे सचिव आणि खासदार विनायक राऊत आणि अनिल देसाई यांनी हा वाद मिटवताना सुधाकर सुर्वे आणि विलास पोतनीस यांना पाठिंबा दिला. तर वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांच्याकडे या मुद्यावर नव्हते समाधानकारक उत्तर नसल्याचीही माहिती समोर आलीय. त्यामुळे आता सिद्धेश कदम यांच्याबाबत युवासेनेकडून ऍक्शन घेतली जाते का? हे पाहणं महत्त्वाचंय.