ताजी बातमी ऑनलाईन टीम
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कारने दोन मोटरसायकलला भरधाव वेगाने आलेल्या कारने धडक देवून झालेल्या अपघातात अंबप येथील दत्तात्रय अनिल मगदूम (वय 32) या मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला. अपघाताची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे.
याबाबत पोलीसातून घेतलेली माहिती अशी की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पवनकुमार जयप्रकाश जयस्वाल (वय 27, रा.ताराबाई पार्क, कोल्हापूर) हा हुंदाई कारने भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने निघाला होता. दरम्यान अंबप फाटय़ाजवळ या कारने दोन मोटारसायकलस्वारांना जोराची धडक दिली. या धडकेत एका मोटारसायकलवरील दत्तात्रय अनिल मगदूम (वय 32, रा. अंबप फाटा,ता.हातकणंगले) हा हॉटेल व्यावसाईक जागीच ठार झाला. तर दुसऱ्या धडक दिलेल्या मोटारसायकलचा चालक विनोद वसंत धनवडे (रा.चावरे,ता.हातकणंगले) हा गंभीर जखमी झाला.जखमी विनोद यास कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले असून त्याचेवर उपचार सुरु आहेत.
या प्रकरणी कार चालक पवनकुमार जयस्वाल याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत दत्तात्रय हा अविवाहित होता त्याचे पश्चात आई वडील व भाऊ असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने अंबप परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची नोंद वडगाव पोलिसात झाली असून अधिक तपास पो.ना.पाटील करत अ.




