Saturday, November 23, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : साडेपाच लाख रेशन कार्डधारकांची दिवाळी होणार गोड! जिह्यात 22 लाख...

कोल्हापूर : साडेपाच लाख रेशन कार्डधारकांची दिवाळी होणार गोड! जिह्यात 22 लाख किलो ‘शिधा वस्तू’

दिवाळी सणानिमित्त राज्य सरकारने अंत्योदय व प्राधान्य रेशनकार्डधारकांसाठी 100 रुपयात प्रत्येकी एक किलो प्रमाणात साखर, रवा, चणाडाळ व पामतेल या शिधावस्तूंचे पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिह्यात 22 लाख 1 हजार 468 किलो शिधा वस्तू उपलब्ध होणार आहेत. त्याचा जिह्यातील 5 लाख 50 हजार 367 हजार रेशनकार्डधारकांना लाभ होणार आहे. त्याच्या वाटपाच्या नियोजनासाठी जिल्हा पुरवठा विभाग व रेशन दुकानदार संघटनेकडून तयारी सुरु करण्यात आली आहे.

राज्य सरकारने एक महिन्यासाठी रेशनकार्डधारकांकरीता चार शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कोल्हापूर जिह्यासाठी 22 लाख 1 हजार 468 किलो शिधा वस्तू उपलब्ध होणार आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील 70 हजार 705 रेशनकार्डधारकांसाठी 2 लाख 82 हजार 820 किलो शिधा वस्तू, करवीर तालुक्यातील 69 हजार 384 रेशनकार्डधारकांसाठी 2 लाख 77 हजार 536 किलो शिधा वस्तू, पन्हाळा तालुक्यातील 42 हजार 389 कार्डधारकांसाठी 1 लाख 69 हजार 556 किलो शिधा वस्तू, हातकणंगले तालुक्यातील 64 हजार 152 कार्डधारकांसाठी 2 लाख 56 हजार 608 किलो शिधा वस्तू,

इचलकरंजी शहरासाठी 35 हजार 201 कार्डधारकांसाठी 1 लाख 40 हजार 804 किलो शिधा वस्तू, शिरोळ तालुक्यातील 57 हजार 821 कार्डधारकांसाठी 2 लाख 31 हजार 284 किलो शिधा वस्तू, कागल तालुक्यातील 38 हजार 723 कार्डधारकांसाठी 1 लाख 54 हजार 892 किलो शिधा वस्तू, शाहुवाडी तालुक्यातील 27 हजार 480 कार्डधारकांसाठी 1 लाख 9 हजार 920 किलो शिधा वस्तू, गगनबावडा तालुक्यातील हजार 395 कार्डधारकांसाठी 21 हजार 580 किलो शिधा वस्तू, राधानगरी तालुक्यातील 33 हजार 276 कार्डधारकांसाठी 1 लाख 33 हजार 104 किलो शिधा वस्तू, गडहिंग्ल तालुक्यातील 32 हजार 585 कार्डधारकांसाठी 1 लाख 30 हजार 340 किलो शिधा वस्तू, आजरा तालुक्यातील 20 हजार 666 कार्डधारकांसाठी 82 हजार 664 किलो शिधा वस्तू, चंदगड तालुक्यातील 27 हजार 986 कार्डधारकांसाठी 1 लाख 11 हजार 944 किलो शिधा वस्तू, भुदरगड तालुक्यातील 24 हजार 603 कार्डधारकांसाठी 98 हजार 412 किलो शिधा वस्तूंचे वितरण केले जाणार आहे.

किटद्वारे होणार वितरण दिवाळीसाठी 100 रुपयात प्रत्येकी एक किलो प्रमाणात साखर, रवा, चणाडाळ व पामतेल या वस्तूंचे एकत्रित ‘किट’द्वारे रेशन दुकानातून वितरण केले जाणार आहे. स्वतंत्ररित्या यातील कोणत्याही वस्तूंचे वितरण होणार नाही. ई-पॉस मशिनद्वारेच दुकानांमधून ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.

दिवाळीसाठी सरकारने जाहीर केलेल्या 100 रुपयात चार शिधावस्तूंच्या पॅकेजच्या वितरणाबाबत पुरवठा विभाग व रेशन दुकानदार यांच्याकडून नियोजन सुरु आहे. 15 दिवसात या वस्तू रेशन दुकानदारांना प्राप्त होणार असून त्यानंतर तातडीने त्याचे कार्डधारकांना वाटप केले जाणार आहे. दिवाळीसणापूर्वी लाभार्थ्यांना वस्तू मिळतील या दृष्टीने प्रयत्न राहतील. यासाठी दुकानदार सुटी न घेता यासाठी काम करणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -