ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी केंद्र सरकार सिमकार्ड व बँकिंग क्षेत्रांतील नियम अधिक सक्तीचे करण्याच्या विचारात आहे. सध्या याबाबत चर्चा सुरू असून, लवकरच नवी नियमावली जाहीर केली जाऊ शकते..
केंद्रीय गृह मंत्रालयाने या विषयावर वित्त मंत्रालय, कॉर्पोरेट व्यवहार व दूरसंचार मंत्रालयासोबत नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यात नवीन सिमकार्ड जारी करणं, तसेच बॅंकेत नवीन खातं उघडण्यावर काही निर्बंध घालण्यावर चर्चा झाल्याचे समजते.
काय बदल होणार..?
– सध्या फक्त आधारकार्ड व्हेरिफिकेशनवर सिमकार्ड व नवीन खातं उघडता येतं.. मात्र, टेलिकॉम ऑपरेटर व बँकांसाठी ‘फिजिकल व्हेरिफिकेशन’चा नियम अनिवार्य केला जाऊ शकतो.
– नवीन सिमकार्ड देताना, तसेच बॅंकेत नवीन खातं उघडता ‘केवायसी’ची सक्ती केली जाऊ शकते. त्यासाठी ‘फिजिकल व्हेरिफिकेशन’ आवश्यक केले जाऊ शकते.
– कंपन्यांचं खाते इनकाॅर्पोरेशन सर्टिफिकेटवर उघडलं जातं. मात्र, या सगळ्या गोष्टी फिजिकल ‘केवायसी’ केल्याशिवाय सुरू होऊ नयेत, असा प्रस्ताव देण्यात आला आहे.