क्रिकेट विश्वातील दिग्गज संघामध्ये टीम इंडियाचा समावेश होतो. भारताने आतापर्यंत तीन विश्वचषक जिंकले आहेत. या तीन विश्वचषकांपैकी दोन विश्वचषक जिंकण्यात ज्याचे महत्त्वाचे योगदान होते तो माजी क्रिकेटर म्हणजे गौतम गंभीर. गौतम गंभीर हा त्यावेळी विश्वचषकात सर्वात जास्त धावा करणारा क्रिकेटर ठरला होता.
क्रिकेटच्या या दोन्ही प्रकारात गौतम गंभीर याने दमदार खेळी करत भारताला विश्वचषक मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली आहे. आज म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी गौतम गंभीर याचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याविषयी अधिक माहिती….
गौतम गंभीरचा जन्म 14 ऑक्टोबर 1981 रोजी दिल्लीतील एका व्यापारी कुटुंबात झाला. त्याचे वडील दीपक गंभीर यांचा टेक्सटाइलचा बिझनेस आहे. आई सीमा या गृहिणी आहे. गौतम गंभीरला एक लहान बहीण असून तो अमेरिकेतील बोस्टन येथे राहतो. गौतम गंभीरने 2003 मध्ये टीम इंडियात पदार्पण केले. गौतम गंभीर हा क्रिकेट विश्वातील मोठ्या सामन्यांचा खेळाडू म्हणून ओळखला जात होता. त्याने भारतासाठी अनेक सामने खेळले असून दमदार कामगिरी देखील केली आहे. मात्र, या महान खेळाडूच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट निराशाजनक झाला.






