ताजी बातमी ऑनलाईन टीम
कळंबा : दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात सोने, दुचाकी, कार, इलेक्ट्रानिक्स वस्तूच्या खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल झाली. मात्र सुर्वेनगरात राहणाऱ्या एका युवकाने खरेदी केलेल्या दुचाकीचीचं गावभर चर्चा रंगली. चर्चा तर होणारच, भावानं काय एक-दोन नाही तर तब्बल २१ लाखांची दुचाकी घेतलीयं. अन् ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढली.
सुर्वेनगरातील दत्त जनाई नगरात राहणाऱ्या राजेश चौगुले याने ही तब्बल २१ लाखांची दुचाकी खरेदी केलीय. कावासकी निंजा झेडएक्स १० आर असे या दुचाकीचे नाव आहे. राजेशने साई मंदिर कळंबा ते राहत्या घरापर्यंत ढोलताशांच्या गजरात गाडीची वाजतगाजत मिरवणूक काढली. २१ लाखांची ही दुचाकी पाहण्यासाठी परिसरातील लोकांची एकच झुंबड उडाली. २१ लाखाच्या या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे १००० सीसी इंजिन, १८ लिटर इंधनटाकी, १५ किमी प्रति लिटर मायलेजसह २५५ किमी प्रतितास आहे. तर हायस्पीड ३०२ किमी प्रतितास आहे.