मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर कायमच आपल्या अप्रतिम खेळाडू शैलीमुळे आजही चाहत्यांचा लोकप्रिय खेळाडू आहे.आज सचिन तेंडूलकरचे भारतातच नाही तर जगभरात लाखो चाहते आहेत. सचिन तेंडूलकर क्रिकेटविश्वातून रिटार्ड झाला असला तरी आजही त्याला मैदानावर पाहात त्याच्या चाहत्यांना आनंद होईलच. कधी तो पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर येतोय अशी त्याच्या चाहत्यांनी मनोमनं इच्छा असते. क्रिकेटच्या मैदानातून सचिन बाहेर असला तरी तो जाहिरातींच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून कायमच चाहत्यांच्या संपर्कात असतो.
सचिन तेंडूलकरनं नुकतीच कोल्हापूरला भेट दिली. त्याबद्दलची एक पोस्ट तेज घाटगे यांनी इन्टाग्रामवर (Instagram) शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ”आजची संध्याकाळ एक जबरदस्त सरप्राईज देणारी ठरली. माझे बंधू गौरव यांनी मला फोन करून सांगितलं की त्यांचे जवळचे आणि खूप मोठे मित्र त्यांच्या प्रवासात कोल्हापुरात थांबणार आहेत. तर त्यांचा पाहुणचार करावा. त्याप्रमाणे आम्ही आमच्या शेतावर या पाहुण्यांची वाट पाहात थांबलो. जेंव्हा पाहुणे आमच्याकडे पोचले, तेंव्हा आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
ज्यांना आपण अनेक वर्षे क्रिकेटच्या मैदानात बघितलं, ज्यांनी आपल्या खेळाने जागतिक विक्रम केले आणि आपल्या वागण्यातून करोडो चाहत्यांना जिंकलं असे मास्टर ब्लास्टर विक्रमवीर सचिन तेंडुलकर आमच्या फार्म हाऊसवर आले होते. क्षणभर आम्हापैकी कोणाला विश्वास वाटला नाही, पण हे खरं होतं. साक्षात सचिन तेंडुलकर यांचा पाहुणचार करायला आम्हाला मिळाला हीच खूप मोठी गोष्ट होती. अगदी थोडक्या वेळेत त्यांनी घाटगे कुटुंबियांचा पाहुणचार स्वीकारला, अस्सल कोल्हापुरी डिशेसचा आस्वाद घेतला आणि ते पुढील प्रवासासाठी निघाले. त्यांची ही धावती भेट आमच्या सदैव स्मरणात राहील..”
कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानी श्री दत्त दर्शनासाठी भेट दिली. यावेळी सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देखील सोबत होता. ही भेट अचानक दिल्याने अनेक सचिनच्या चाहत्यांना इछा असून देखील भेटता आलं नाही.
क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा कोल्हापुरात काल रात्री आला होता. पण आज पहाटे 4:45 वाजता सचिन तेंडुलकर व त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांनी अचानक श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथ दाखल झाले. या दोघांनी कृष्णा – पंचगंगा नदीच्या संगमावर असलेल्या श्री दत्त महाराजाचे दर्शन घेतलं. नवल खोंबारे यांनी श्री दत्त चरणी प्रार्थना करून सचिनला श्रीफळ प्रसाद दिला.
पहाटेची वेळ होती तरी देखील सचिन तेंडुलकर यांनी रांगेतून दर्शन घेतले. सचिन तेंडुलकर हे आपल्या सोबत आपला मुलगा अर्जुनला आणलं होतं त्यामुळे अर्जुनला दत्त महाराज यांचा आशीर्वाद मिळावा म्हणूनच सचिन दत्तमहाराज चरणी दाखल झाल्याची चर्चा सुरू होती.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा श्रीक्षेत्र नृसिंहवाडी इथं येऊन गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे नेहमी मंदिर परिसरात असणाऱ्यांनी मंदिराकडे धाव घेतली पण तोपर्यंत सचिन दर्शन घेऊन निघून गेला होता. सचिन तेंडुलकर यांनी दत्त महाराजांची घेतलेला दर्शनाचा व्हिडिओ (video) देखील वाऱ्यासारखा राज्यभर पसरला त्यावेळी अनेक चाहत्याना आपण त्यावेळी दत्त मंदिरात असायला हवं होत अस वाटलं.