ताजी बातमी ऑनलाईन टीम
आता अंतिम टप्प्यात आहे. वर्ल्डकपचा फायनल सामना 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अशातच आता आयसीसीने (Icc) मध्येच सेमीफायनल आणि फायनल सामन्यासाठी नवे नियम आणले आहेत. तुमच्याही मनात प्रश्न आला असेल हे नवे नियम नक्की काय असतील. चला तर जाणून घेऊया हे नवे नियम काय आहे.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पावसामुळे अनेक सामने रद्द झाले आहेत. अशातच सेमीफायनल आणि फायनलच्या सामन्यामध्ये पावसाचा खेळ होईल या भीतीने आयसीसीने हा नियम केला आहे. पावसामुळे कोणत्याही टीमवर अन्याय होणार नाही, याचा विचार करण्यात आलाय. त्यानुसार, वर्ल्डकपच्या सेमीफायनल आणि फायनलच्या सामन्यांचा निकाल लावण्यासाठी दोन्ही डावात प्रत्येकी 10 ओव्हर टाकणं बंधनकारक आहे. हा महत्त्वाचा निर्णय आयसीसीने घेतला आहे.
त्यामुळे आता आयसीसीच्या नव्या नियमानुसार, कोणत्याही सामन्यामध्ये 10 ओव्हर्स पूर्ण झाले नसतील तर सामन्याचा निकाल लागणार नाही.
याशिवाय एखादा सामना टाय झाला, पाऊस आला किंवा इतर कारणांमुळे सामना नियोजित दिवशी खेळवला जाऊ शकला नाही, तर हे महत्त्वाचे सामने राखीव दिवशी खेळवले जातील. मात्र, मॅच ऑफिशियल्सने त्याच दिवशी सामना पूर्ण करण्यावर भर द्यावा. भलेही त्या दिवशी 10-10 ओव्हरचा खेळ होईल.
जर सामना नियोजित वेळेवर सुरू झाला आणि सामना सुरु असतनाच पाऊस आला, किंवा अशी परिस्थिती निर्माण झाली ज्यावेळी सामना पुन्हा सुरू होऊ शकत नाही, तर राखीव दिवशी सामना जिथे थांबला होता तिथूनच पुढे सुरु केला जाईल. आयसीसीचा हा निर्णय फॅन्स आणि क्रिकेट टीम दोघांसाठीही चांगला आणि आनंदाचा ठरू शकतो.