Thursday, August 7, 2025
Homeक्रीडाभारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल सामन्यावेळी पाऊस आला तर? आयसीसीनं केली आहे खास...

भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल सामन्यावेळी पाऊस आला तर? आयसीसीनं केली आहे खास योजना

आता भारत हा ग्रुप 2 मधून सर्वाधिक गुणांनी सेमीफायनलमध्ये पोहोचल्यामुळे भारताची लढत ग्रुप 1 मधून दुसऱ्या क्रमांकावर सेमीफायनल गाठलेल्या इंग्लंड संघाशी (IND vs ENG) असणार आहे. हा सामना 10 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड येथील अॅडलेड ओव्हल मैदानात होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना होणार आहे. पण आतापर्यंत आपण पाहिलं तसं यंदाच्या विश्वचषकात बऱ्याच सामन्यात पावसामुळे व्यत्यय आल्याचं पाहायला मिळालं. सामने रद्द झाल्यामुळे दोन्ही संघाना 1-1 गुण मिळाले, त्यामुळेच काही संघाना सेमीफायनल गाठणं शक्य झालं नाही. कारण सहज जिंकता येणारे सामनेही पावसामुळे रद्द झाले आणि एका गुणावर तगड्या संघाना समाधान मानावं लागलं. दरम्यान आता सेमीफायनलच्या सामन्यांवेळी असं झालं तर? असा प्रश्न अनेकांना पडला असून त्यासाठी आयसीसीने एक खास योजना आखली आहे.

सेमीफायनल सामन्यांदरम्यान पावसाने कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. त्यामुळे पावसामुळे नियोजित सेमीफायनल आणि फायनलच्या दिवशी मॅचचा निकाल येऊ शकला नाही, तर सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत 9 नोव्हेंबरला पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आणि 10 नोव्हेंबरला भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामना होणार असून जर या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पावसाने अडथळा निर्माण केला तर हा सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच राखीव दिवशी पूर्ण केला जाऊ शकतो.

भारत-पाकिस्तान येऊ शकतात फायनलमध्ये आमने-सामने?

तर ग्रुप 2 मधून भारत आणि पााकिस्तान हे दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये गेले आहेत. भारतानं 5 पैकी 4 सामने जिंकून एकूण 8 गुणांसह दिमाखात सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका अखेरच्या सामन्यात नेदरलँडकडून पराभूत झाल्याने पाकिस्तान बांग्लादेशला मात देत सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. आता भारत इंग्लंडसोबत आणि पाकिस्तान न्यूझीलंडसोबत सेमीफायनल खेळेल आणि दोघे संघ आपआपले सामने जिंकून फायनलमध्ये आमने-सामने येऊ शकतात.

सर्वात पहिली सेमीफायनल पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 9 नोव्हेबर रोजी सिडनीच्या क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. तर त्यानंतर लगेचच 10 नोव्हेंबर रोजी भारत आणि इंग्लंड हा सामना अॅडलेडच्या अॅडलेड ओव्हल मैदानावर रंगणार आहे. दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवले जाणार असून त्यापू्वी अर्धातास नाणेफेक होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -