Sunday, August 3, 2025
Homeकोल्हापूरKolhapur: वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमाला नेसरीत विरोध

Kolhapur: वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमाला नेसरीत विरोध

‘हर हर महादेव’ या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप अनेक नेत्यांनी केल्यानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यानंतर आता वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाला कोल्हापुरात विरोध केला आहे. सिनेमात वीरांची नावं बदलल्याचा आरोप चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्यावर करण्यात आला आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होवू देणार नाही असाही इशारा नेसरीकरांनी दिला आहे.

नेमका आरोप काय आहे

वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमात वीरांची नावं बदलल्यानं गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. नेसरी येथे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि खानाचं युध्द झालं होत.चित्रपटात महेश मांजरेकर यांनी काल्पनिक नावे दिली आहेत. म्हणून नेसरीसह पंचक्रोशीत याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप नेसरीकरांनी केला आहे. जे वीर धारातीर्थ पडले आहेत ती नावे वेगळी आहेत आणि चित्रपटात नावे वेगळी आहेत. महेश मांजरेकरांनी नेसरी परिसर पहावा, संपूर्ण इतिहास वाचाव मग चित्रपट तयार करावा असा इशारा यावेळी देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -