ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 100 दिवसानंतर राऊत तुरुंगातून बाहेर आले. राऊतांना जामीन मिळाल्याने ठाकरे गटाच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे ऑर्थर रोड कारागृहाबाहेर राऊतांची एक झलक पाहण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली.
संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया यावेळी संजय राऊत कारमधून बाहेर आले आणि कार्यकर्त्यांची हार स्विकारले. त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा जुने राऊत दिसून आले. ‘बाहेर आलोय, बघू आता पुढे काय होतंय. आम्ही लढणारे आहोत, लढत राहू. न्यायालयानेच माझी अटक बेकायदेशीर ठरवलीये. कार्यकर्त्यांनी कार्यक्रम ठरवला आहे, तिकडेच जातोय. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणारच आहे,’ अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.