Saturday, July 5, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर: हालेवाडी फाट्यावर मद्यधुंद तरुणांचा हवेत गोळीबार?, हुपरी-रेंदाळचे आठ जण ताब्यात

कोल्हापूर: हालेवाडी फाट्यावर मद्यधुंद तरुणांचा हवेत गोळीबार?, हुपरी-रेंदाळचे आठ जण ताब्यात

हालेवाडी (ता.आजरा) फाट्याला हुपरी – रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील मद्यधुंद तरुणांकडून हवेत गोळीबार झाल्याचा संशय आहे.पोलिसांनी इनोव्हा गाडीतील आठ जणांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

प्रत्यक्षदर्शी हॉटेल मालकाकडून मिळालेली माहिती अशी, रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान हालेवाडी फाट्याला इनोव्हा गाडीमधील टेप मोठ्याने लावून तरुणांचा दंगा सुरु असल्याचे लक्षात आले. अर्धा ते पाऊण तास दंगा सुरूच होता.त्यानंतर भांडणाचा आवाज येण्यास सुरु झालेनंतर हॉटेल मालकासह वेटर गाडीच्या दिशेने गेले. रस्त्यावरुन आपल्याकडे लोक येत असल्याचे पाहून या तरुणांनी हवेत गोळीबार केला व पटापट गाडीत बसले. व आपल्याकडे येणाऱ्या हॉटेल मालकासह कामगारांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न चालकाने केला. संबंधित हॉटेल मालकाने याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला दिली.

पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करुन तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान गाडी नंबर वरून संबंधित तरुणांना आजऱ्यातील हॉटेल मॉर्निंग स्टार व हॉटेल नैनीताल जवळून ताब्यात घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांनी तरुणांकडून गोळीबाराबाबत चौकशी सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची आजरा पोलिसात नोंद झालेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -