Sunday, February 23, 2025
Homeक्रीडाVirat Kohli आणि Surya Kumar Yadav चा जलवा, ICC ने दिली 'Most...

Virat Kohli आणि Surya Kumar Yadav चा जलवा, ICC ने दिली ‘Most Valuable Team’ मध्ये जागा!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने (ICC) सोमवारी नुकत्याच पार पडलेल्या टी 20 वर्ल्ड कप 2022 तील (T20 World Cup 2022) सर्वोत्तम टीमची (Most Valuable Team) घोषणा केली आहे. या टीममध्ये टीम इंडियाच्या विराट कोहली (Virat Kohli) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर, टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) 12वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आलीय. आयसीसीच्या या सर्वोत्तम टीममध्ये सहा वेगवेगळ्या देशांतील खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

टीम इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर आणि ओपनर अॅलेक्स हेल्स यांना 2 व्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. समीफायनलमध्ये दोघांनी मिळून आपल्या टीम इंडिया विरुद्ध 10 विकेट्सने आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता. बटलर आणि अॅलेक्सनंतर विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकाचे स्थान देण्यात आले आहे. कोहलीही टीम इंडियात तिसऱ्या क्रमांकावर खेळतो. या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा बॅट्समन ठरला आहे.

विराट कोहलीने वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केली. त्याने 6 डावात 98.67 च्या सरासरीने 296 धावा केल्या आहेत. तर आयसीसीच्या सर्वोत्तम टीममध्ये सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. सूर्यकुमारने देखील वर्ल्डकपमध्ये चांगली खेळी केली. तर पाचव्या क्रमांकावर टी 20 वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावणारा ग्लेन फिलिप्सला ठेवण्यात आले आहे. झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा याचाही या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याला सहाव्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे.

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खानचा देखील या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. सातव्या क्रमांकावर शादाबची निवड करण्यात आली आहे. वर्ल्डकपमध्ये शादाबने 98 धावा केल्या आणि 11 विकेट घेतल्या. अष्टपैलू बॉलर आणि ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ सॅम कुरनला बॉलरमध्ये आठव्या क्रमांकावर पहिले स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर आफ्रिकेचा फास्ट बॉलर एनरिक नोर्किया याला नवव्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर इंग्लंड आणि टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात फास्ट बॉलर मार्क वुडला 10व्या क्रमांकावर स्थान देण्यात आले. टीम पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीला अकराव्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. तर टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची 12वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -