Thursday, July 24, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरातील खुपीरेत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

कोल्हापुरातील खुपीरेत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

कोपार्डे – खुपीरे (ता. करवीर) येथील युवकाने आज, सोमवारी पहाटे शेतातील झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अर्जुन निवृत्ती पाटील (वय ३६) असे या युवकाचे नाव आहे.घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, अर्जुन पाटील हे घरची शेती सांभाळत कुटुंबाचा गाडा चालवत होते. आज सकाळी ते पिकाला पाणी आल्याचे सांगून व वैरण घेऊन येतो म्हणून पहाटे लवकर बाहेर पडले होते. सकाळी आठच्या सुमारास लिंबू टेक नावाच्या शेतात आजूबाजूच्या शेतकऱ्यांना अर्जुनने झाडाला गळफास लावून घेतल्याचे दिसले. शेतकऱ्यांनी याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिली.

या घटनेची माहिती अर्जुनचे चुलते ज्ञानदेव पाटील यांनी करवीर पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून उत्तरिय तपासणीसाठी अर्जुन यांचा मृतदेह कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. उत्तरिय तपासणीनंतर नातेवाईकांना अर्जुनचा मृतदेह ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -