Sunday, July 27, 2025
Homeयोजनानोकरीदीड तासात ठरणार उमेदवाराचे भवितव्य, पोलिस भरतीची प्रक्रिया ‘अशी’ राबवणार..

दीड तासात ठरणार उमेदवाराचे भवितव्य, पोलिस भरतीची प्रक्रिया ‘अशी’ राबवणार..

राज्यात लवकरच 18,334 रिक्त जागांसाठी पोलिस भरती केली जाणार असल्याचे शिंदे-फडणवीस सरकारने काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार, या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 9 नोव्हेंबरपासून भरतीसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे.

राज्यात मोठ्या कालावधीनंतर बंपर पोलिस भरती होत असल्याने, तरुणांना पोलिस दलात सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मात्र, ही भरती प्रक्रिया कशी होणार, परीक्षा कधी नि कशी असणार, उमेदवारांची निवड कशी होणार, असे एक ना अनेक प्रश्न उमेदवारांना पडले आहेत. चला तर मग, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

कशी होणार पोलिस भरती?

पोलिस भरतीसाठी शारीरिक व लेखी, अशा दोन चाचण्या होतील. सुरुवातीला उमेदवारांची शारीरिक परीक्षा होईल व त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

शारीरिक चाचणी

पद – पोलिस शिपाई (एकूण 50 गुण)

पुरुष उमेदवारासाठी
– 1600 मीटर धावणे (20 गुण)
– 100 मीटर धावणे (15 गुण)
– गोळाफेक (15 गुण)

महिला उमेदवारांसाठी
– 800 मीटर धावणे (20 गुण)
– 100 मीटर धावणे (15 गुण)
– गोळाफेक (15 गुण)

सशस्त्र पोलिस शिपाई (एकूण 100 गुण)

पुरूष उमेदवारांसाठी
– 5 किमी धावणे (50 गुण)
– 100 मीटर धावणे (25 गुण)
– गोळाफेक (25 गुण)

शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील.

लेखी परीक्षा

भरतीसाठी 100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल, जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल.
– पीएसटी फेरी 50 गुणांची असेल, पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी किमान 50 टक्के गुण मिळवणे आवश्यक.
– सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे असतील. चुकीच्या उत्तरासाठी गुण कपात केली जाणार नाही. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल.
– गणित, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, अशा प्रत्येक विषयावर 25 प्रश्न व त्यासाठी 25 गुण असतील.

चालक पदासाठी चाचणी

हलके मोटार वाहन चालविण्यासाठी 25 गुण व जीप प्रकारातील वाहन चालविण्यासाठी 25 गुण, अशी 50 गुणांची कौशल्य चाचणी होईल.
– दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान 40 टक्के गुण मिळवावे लागतील.
– ही केवळ अहर्ता चाचणी असून, त्यातील गुण एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत.
– कौशल्य चाचणीत उत्तीर्ण उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -