शहरासह जिह्यातील कारखान्यांचा उस गळीत हंगात सुरु झाला आहे. यामुळे ऊस पुरवठा करणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात होते. याचा परिणाम शहरातील वाहतुकीवर होवू नये यासाठी शहर वाहतूक शाखेने उस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी, ट्रॅक्टर,ट्रक यांना शहरात नो एंट्री करण्यात आली आहे. कारखान्यांना ऊस पुरवठा करणारया वाहनांनी शहराबाहेरुन रिंगरोडवरुन ये जा करण्याच्या सुचना शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
अशी राहणार ऊस वाहतूक
राजाराम कारखान्याकडे : तावडे हॉटेलकडून ताराराणी पुतळा मार्गे सदर बाजार धैर्यप्रसाद हॉल चौक पोलीस अधिक्षक कार्यालय कसबा बावडा मेन रोड राजाराम साखर कारखान्याकडे मार्गस्थ. बालींगाकडून फुलेवाडी रंकाळा टॉवर रंकाळा स्टँड गंगावेश डावीकडे वळण छत्रपती शिवाजी महाराज पुल उजवीकडे वळण सी पी आर सिग्नग्नल चौक-महावीर कॉलेज कसबा बावडा मेन रोड राजाराम साखर कारखान्याकडे मार्गस्थ. भोगावती व कळंब्याकडून पुईखडी नवीन वाशी नाका उजवे वळण रिंग रोड कळंबा संभाजीनगर रिंगरोड -सायबर चौक-हायवे कँटीन डावे वळण उडडाण पुल ताराराणी पुतळा सदरबाजार धैर्यप्रसाद हॉल पोलीस अधीक्षक-कार्यालय कसबा बावडा राजाराम साखर कारखान्याकडे मार्गस्थ. राजाराम कारखान्याकडे ऊस वाहतुकीस रात्री 10 ते सकाळी 6 वा. पर्यंत मुभा असून इतर वेळेमध्ये प्रतिबंध करण्यात आला आहे.
डी. वाय. पाटील व कुडित्रे कारखान्याकडे : तावडे हॉटेल कडून ताराराणी पुतळा उजवीकडे वळण-सदर बाजार धैर्यप्रसाद हॉल हेडपोस्ट ऑफीस महावीर कॉलेज सीपीआर सिग्नग्नल उजवे वळण शिवाजी पूल चौक-गंगावेश उजवे वळण रंकाळा स्टॅन्ड- रंकाळा टॉवर फुलेवाडी डी. वाय. पाटील कारखाना व कुडित्रे डावे वळण कारखान्याकडे मार्गस्थ
बिद्री कारखान्याकडे : तावडे हॉटेल कडून ताराराणी पुतळा डावे वळण उडडाण पूल हायवे कॅन्टीन चौक- सायबर चौक डावे वळण रिंगरोड मार्गे संभाजीनगर डावे वळण कळंबा बिद्री कारखान मार्गस्थ.
भोगावती कारखान्याकडे : तावडे हॉटेल कडुन ताराराणी पुतळा डावे वळण उडडाण पुल हायवे कॅन्टीन सायबर चौक डावे वळण रिंग रोड मार्गे संभाजीनगर डावे वळण कळंबा सईमंदिर उजवे वळण रिंग रोड नविन वाशी नाका डावे वळण-भोगावती कारखान्याकडे मार्गस्थ.
दत्त दालमियाँ कारखान्याकडे : तावडे हॉटेल कडून ताराराणी पुतळा उजवीकडे वळण सदर बाजार धैर्यप्रसाद हॉल-हेडपोस्ट ऑफीस महावीर कॉलेज सीपीआर सिग्नल उजवे वळण छत्रपती शिवाजी महाराज पुल दत्त दालमियाँ कारखान्याकडे मार्गस्थ. फुलेवाडी-रंकाळा टॉवर रंकाळा स्टँड गंगावेश डावीकडे वळण छ. शिवाजी पुल उजवीकडे वळण-सीपीआर सिग्नग्नल चौक महावीर कॉलेज कसबा बावडा
स्पिकर लावल्यास दंडात्मक कारवाई
ऊस वाहतुक करणारे ट्रक्टर या वाहनांमध्ये वाहतुक सुरु असताना मोठ-मोठयाने स्पीकर वाजविण्यात येतात ते वाजविण्यात येवु नयेत. तसेच ट्रक, ट्रक्टर-ट्रॉली, इत्यादी वाहनामध्ये प्रमाणापेक्षा जादा (ओव्हरलोडींग) ऊस भरु नये. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
वाहनांना रिफ्लेक्टर लावावेत
ऊस वाहतूकीदरम्यान वाढते अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी कारखान्यांनी व वाहतूकदारांनी वाहनांना रिफ्लेक्टर बसवून घ्यावेत. याचसोबत रात्रीच्या वेळी अंधाराच्या ठिकाणी वाहने थांबवू नयेत, असे आवाहन शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी केले.