Sunday, August 3, 2025
Homeराजकीय घडामोडी40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार, जाणून घ्या कारण…

40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार, जाणून घ्या कारण…

शिवसेनेत बंडाळी करून राज्याचे मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे (Maharashtra CM Eknath Shinde) पुन्हा एकदा गुवाहाटीचा दौरा (Guwahati Visit) करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे येत्या 21 नोव्हेंबरला कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गुवाहाटी जाणार आहेत. यावेळी देखील मुख्यमंत्र्यांसोबत शिंदे गटातील मंत्री आणि आमदार, खासदार असणार आहेत. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री आसामचा दौरा करणार आहेत, अशी माहिती शिंदे गटातील आमदार बच्चू कडू (MLA Bachchu kadu) यांनी दिली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात जून महिन्यात राजकीय भूकंप आला होता. यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार जमीनदोस्त झालं होतं. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मदतीने सत्ता स्थापनेचा दावा केला होता. नंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्‍यमंत्रिपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे गट आणि भाजप सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार देखील केला होता.

कामाख्या देवीचा नवस फेडणार
शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं, की गुवाहाटीला आम्ही सर्व आमदार जाणार आहेत. आम्ही सगळ्यांनी कामाख्या देवीला नवस केला होता. तो नवस या दौऱ्यात फेडणार आहे. राज्यात दिव्यांग मंत्रालय व्हावं, बळीराजाचं भलं व्हावं, यासाठी कामाख्या देवीला नवस केला होता.

दरम्यान, गेल्या जून महिन्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेतील 40 हून जास्त आमदारांनी बंडखोरी केली होती. नंतर गुजरातमधील सुरतव्हाया थेट गोवाहाटी गाठलं होतं. भाजपच्या मदतीनं राज्यात सरकार स्थापण करून एकनाथ शिंदे स्वत: राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. इतकंच नाही तर शिवसेना आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्न धनुष्यबाणावर देखील दावा केला होता. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -