Sunday, August 3, 2025
Homeब्रेकिंगगोवरचा उद्रेक! 8 महिन्यांच्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू

गोवरचा उद्रेक! 8 महिन्यांच्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये गोवरचा उद्रेक (Measles Outbreak) दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गोवरची लागण झालेल्या बालकांमध्ये वाढ होत चालली आहे. या गोवरमुळे सरकार आणि मुंबई महानगर (BMC) पालिकेची चिंता वाढली आहे. पालिकेकडून उपाययोजना केली जात आहे. गोवरमुळे अनेक बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशामध्ये आता गोवरने आणखी एका बालकाचा बळी घेतला आहे. मुंबईमध्ये गोवरमुळे 8 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

राज्यात गोवरमुळे आणखी एका बालकाचा मृत्यू (measles death child) झाला आहे. भिवंडीतील 8 महिन्यांच्या बालकाचा मुंबईमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता गोवरमुळे जीव गमावणाऱ्या बालकांची संख्या 12 झाली आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मुंबईत गोवरचे 13 नवीन रुग्ण आढळले आणि संसर्गामुळे एकाचा मृत्यू झाला. गोवरच्या 30 नवीन रुग्णांना शहरातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 22 रुग्णांना घरी सोडण्यात आले. याशिवाय सर्वेक्षणादरम्यान गोवरचे 156 संशयित रुग्ण आढळून आले आहेत.

लहान मुलांना गोवरची बाधा होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यात आता 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांनाही गोवरची लागण होत आहे. त्यामुळे तुमच्या बालकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानं लस द्या (Vaccine) आणि काळजी घ्या, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. मुंबईनंतर आता i) ठाण्यातील भिवंडीमध्ये गोवर, रुबेला आजाराने कहर केला आहे. गोवरच्या साथीचे गांभीर्य लक्षात घेता केंद्र सरकारने यासंदर्भात एक बैठक बोलावली. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

वर्षाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत शहरातील गोवर रुग्णांची संख्या 233 वर पोहोचली आहे. बीएमसीने सांगितल्याप्रमाणे, एका दिवसापूर्वीच 1 वर्षाच्या मुलाला गोवरमुळे आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान, मुंबई व्यतिरिक्त, झारखंडमधील रांची, गुजरातमधील अहमदाबाद आणि केरळमधील मलप्पुरममध्येही गोवरचा उद्रेक झाला आहे. केंद्र सरकारने या तीन शहरांमध्ये तज्ज्ञांची टीम पाठवली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, रांची, अहमदाबाद आणि मलप्पुरम मधील मुलांमधील गोवर प्रकरणांच्या वाढीचे मूल्यांकन आणि व्यवस्थापन करण्यासाठी केंद्राने उच्चस्तरीय पथके तैनात केली आहेत. केंद्राची पथकं राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना रोगाचा सामना करण्यासाठी मदत करतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -