Monday, August 11, 2025
Homeतंत्रज्ञानJio App: आता टिकटॉकला टक्कर देणार भारतीय अ‍ॅप, जिओ लाँच करणार शॉर्ट...

Jio App: आता टिकटॉकला टक्कर देणार भारतीय अ‍ॅप, जिओ लाँच करणार शॉर्ट व्हीडिओ प्लॅटफॉर्म

गेल्याकाही वर्षात शॉर्ट व्हीडिओ अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. शॉर्ट व्हीडिओ अ‍ॅप टिकटॉकवर भारतात बंदी घातल्यानंतर अनेक कंपन्यांनी स्वतःचे प्लॅटफॉर्म्स लाँच केले आहेत.इंस्टाग्राम रील्स आणि युट्यूब शॉर्ट्सची लोकप्रियता देखील वाढली आहे. हीच वाढती लोकप्रियता पाहता आता Jio देखील शॉर्ट व्हीडिओ अ‍ॅपला लाँच करणार आहे.

रिपोर्टनुसार, जिओच्या या अ‍ॅपचे नाव Platfom असण्याची शक्यता आहे. Platfom अ‍ॅपसाठी जिओने रोलिंग स्टोन इंडिया आणि Creativeland आशिया यांच्याशी भागीदारी केली आहे.

Platfom अ‍ॅप हे पेड अल्गोरिद्मवर काम करणार नाही, असे सांगितले जात आहे. कंपनीचा उद्देश अ‍ॅपद्वारे चांगल्या टॅलेंटला जगासमोर आणणे हा आहे. प्लॅटफॉर्मवर यूजर्सला लोकप्रियतेच्या आधारावर सिल्वर, ब्लू आणि रेड टिक मिळेल. क्रिएटर्सच्या प्रोफाइलसह बुक नाउ बटन असेल, ज्याद्वारे फॅन्स क्रिएटर्सशी जोडले जाऊ शकतात. जिओच्या या प्लॅटफॉर्मवर मोनेटाइजेशनचा देखील पर्याय मिळेल.

नवीन अ‍ॅपसह जिओकडून फाउंडिंग मेंबर प्रोग्राम देखील सादर केला जाईल. या अंतर्गत १०० फाउंडिंग मेंबरला इनव्हाइट ओनली आधारावर अ‍ॅक्सेस मिळेल. अशा यूजर्सला गोल्डन टिक मिळेल. हे मेंबर्स नवीन आर्टिस्ट अथवा क्रिएटरला इनव्हाइट देखील करू शकतात. कंपनी आपल्या या शॉर्ट व्हीडिओ प्लॅटफॉर्मला पुढील वर्षी लाँच करण्याची शक्यता आहे. या प्लॅटफॉर्मवर गायक, डान्सर, फॅशन डिझाइन सारखे इनफ्लूएंसर सहभागी होऊ शकतात.

नवीन प्रोडक्टच्या लाँचिंगबाबत माहिती देताना Jio Platforms चे सीईओ किरण थॉमस म्हणाले की, ‘जिओ प्लॅटफॉर्म्सवर आमचा उद्देश डेटा, डिजिटल आणि अत्याधुनिक टेक्नोलॉजीचा उपयोग करून आमच्या ग्राहकांसाठी नवीन अनुभव निर्माण करणे हा आहे. आरआयएल समूहाचा भाग म्हणून आम्ही टेलिकॉम, मीडिया, रिटेल, मॅन्यूफॅक्चरिंग, वित्तीय सेवा, शिक्षण आणि आरोग्य सेवांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील प्लॅटफॉर्म्स तयार केले आहेत. आम्ही या नवीन प्लॅटफॉर्मसाठी रोलिंग स्टोन इंडिया आणि क्रिएटिव्हलँड आशिया यांच्याशी भागीदारी केली आहे.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -