Saturday, August 2, 2025
Homeमहाराष्ट्रमोठी दुर्घटना ! पुलाचा अंदाज न आल्याने फॉर्च्यूनर थेट 50 फूट खोल...

मोठी दुर्घटना ! पुलाचा अंदाज न आल्याने फॉर्च्यूनर थेट 50 फूट खोल कॅनॉलमध्ये कोसळली

पंढरपूर -कुर्डुवाडी रोडवर फॉर्च्यूनर गाडीचा जबरदस्त अपघात (accident) होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये हि अपघातग्रस्त (accident) गाडी 50 फूट खोल कॅनॉलमध्ये कोसळली. हि गाडी कुर्डुवाडीवरुन पंढरपूरकडे येणारी फॉर्च्यूनर गाडी आष्टी रोपळे या ठिकाणी आली असता अंदाज न आल्याने कॅनॉलमध्ये कोसळली. या भीषण दुर्घटनेत (accident) दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

काय घडले नेमके?
ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या ठिकाणी एसआयआयएल कंपनीने रस्त्याचे काम केले असून पुलाच्या अर्धवट राहिलेल्या कामामुळे हा अपघात झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला अर्धवट राहिलेल्या कामामुळे अपघात घडू शकतात. या याठिकाणी अजून काम बाकी आहे असा साधा सूचनाफलकदेखील लावण्यात आला नाही. त्यामुळे हे अपघात (accident) घडत असतात.

यामुळे लोकांनी संबंधित रस्ते विकासक कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुदैवाने चारचाकीच्या या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हि कार पुलावरुन थेट 50 फूट खाली कोसळल्याने (accident) दोन महिला या घटनेत गंभीर जखमी झाल्या. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणाहून प्रवास करावा लागतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -