Sunday, August 3, 2025
Homeकोल्हापूरKolhapur Crime : मामा वारल्यानंतर नैराश्यात भाचीने केला आयुष्याचा शेवट ; एकुलत्या...

Kolhapur Crime : मामा वारल्यानंतर नैराश्यात भाचीने केला आयुष्याचा शेवट ; एकुलत्या एक मुलीच्या कृत्याने हळहळ

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोडोली साखरवाडीत मामाच्या झालेल्या मृत्यूच्या नैराश्यातून भाचीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्रद्धा धर्मेंद्र कांबळे (वय 24) असे त्या तरुणीचे नाव असून या घटनेची कोडोली पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार धर्मेंद्र कांबळे यांना श्रद्धा एकूलती एक मुलगी होती. तिने मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करून पुण्यात एका कंपनीमध्ये कार्यरत होती. मामा संचित कांबळे (उदगाव, ता. शिरोळ) यांच्या निधनानंतर श्रद्धा नैराश्यात गेली होती. या नैराश्यात असतानाच श्रद्धाने दुसऱ्या मजल्यावरील पंख्याच्या हुकाला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी दुसऱ्या मजल्यावर श्रद्धाला जेवण्यासाठी हाक मारण्यासाठी घरातील सदस्य वर गेला असता श्रद्धाने आत्महत्या केल्याचे लक्षात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -