Tuesday, April 23, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; गोकुळ शिरगावमधील अपघातात वृद्धाचा मृत्यू

कोल्हापूर ; गोकुळ शिरगावमधील अपघातात वृद्धाचा मृत्यू

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पुणे बेंगलोर महामार्गावर शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना शिवाजी धोंडीराम हजारे (वय 76 )रा. सिद्धनेर्ली तालुका कागल यांना ट्रकची धडक लागून ते जागीच ठार झाले. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.गोकुळ शिरगाव बस स्टॉप येथे कोणत्याही पादचाऱ्याने पुणे बेंगलोर महामार्ग ओलांडू नये म्हणून पोलिसांनी लोखंडी बॅरिकेट्स लावले आहेत .पण लोक या लोखंडी बॅरिकेट्स मधूनच घुसुन धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडत असतात. गोकुळ शिरगाव लोकनियुक्त सरपंच एम के पाटील यांनी पादचाऱ्यांच्यासाठी निर्माण केलेला भुयारी मार्ग स्वच्छ करून गेल्या चार वर्षापासून योग्य पद्धतीने वापरण्यात येईल असा ठेवला आहे. पण तरीसुद्धा लोक या भुयारी मार्गाचा वापर न करता व आपल्या जीवाची परवा न करता असा धोकादायक रस्ता ओलांडत आहेत. त्यामुळे हा अपघाताला निमंत्रण मिळत आहे.या घटनेची फिर्याद सचिन पाटील यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सह पोलीस निरीक्षक अविनाश माने करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -