Monday, March 4, 2024
Homeतंत्रज्ञानRBI ने लॉन्च केला डिजिटल रुपया, जाणून घ्या कुठे आणि कसा मिळेल?

RBI ने लॉन्च केला डिजिटल रुपया, जाणून घ्या कुठे आणि कसा मिळेल?

ताजी बातमी ऑनलाईन टीम


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गुरुवारी 1 डिसेंबर 2022 रोजी मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू आणि भुवनेश्वर येथे डिजिटल रुपयाचा पायलट प्रोजेक्ट लॉन्च (RBI launched Digital Rupee) केला आहे. रिटेल डिजिटल रुपी प्रकल्प मर्यादित वापरकर्त्यांच्या गटासाठी सुरू करण्यात आला (RBI Digital Rupee) आहे. यात स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि IDFC फर्स्ट बँक या चार बँका ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना व्यवहार करण्याची परवानगी देतील. हा व्यवहार P2P म्हणजेच पर्सन टू पर्सन (Person to Person) आणि P2M म्हणजे पर्सन टू मर्चंट (Person to Merchant) अशा दोन्ही प्रकारे करता येऊ शकेल.

सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) डिजिटल टोकनच्या स्वरूपात जारी केली जाईल आणि ती कायदेशीर निविदा म्हणजेच लीगल टेंडर असेल. म्हणजेच हा रुपया कायदेशीर चलन म्हणून गणला जाईल. सध्या ज्या चलनी नोटा आणि नाणी जारी केली जातात त्याच मूल्यावर ई-रुपया जारी केला जाईल.या डिजिटल रुपीच्या लॉन्चसोबतच भारत स्वतःची ब्लॉकचेन करन्सी सुरू करणाऱ्या निवडक देशांच्या यादीत सामील झाला आहे. परंतु अमेरिकेसारख्या देशाने अद्याप आपली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) लाँच केलेली नाही.

डिजिटल रुपया कुठे खरेदी करावा?
पायलट प्रोजेक्ट अंतर्गत सध्या भारतात स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, येस बँक आणि IDFC फर्स्ट बँक डिजिटल रुपया जारी करू शकतात. आगामी काळात आणखी बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक या चार बँका भारतात डिजिटल रुपये जारी करू शकतील. भारतात सध्या डिजिटल रुपया फक्त मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू आणि भुवनेश्वरमध्ये उपलब्ध असेल. येत्या काही दिवसांत ही सुविधा अहमदाबाद, लखनऊ, हैदराबाद, इंदूर, गंगटोक, गुवाहाटी, कोची, पाटणा आणि शिमला येथेही उपलब्ध होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -