Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीमहामोर्चा, सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार; उद्धव ठाकरेंची घोषणा!

महामोर्चा, सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार; उद्धव ठाकरेंची घोषणा!



महाविकास आघाडी येत्या 17 डिसेंबर रोजी राज्य सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून आणि राज्यपालांकडून महाराष्ट्राचा वारंवार अपमान केला जात आहे असा आरोप विरोधक करत आहेत. या विरोधातच उद्धव ठाकरेंनी आंदोलनाची हाक दिली. राज्यपालांना हटवले जावे अशी मागणी देखील मविआकडून केली जातेय. आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ठाकरेंनी या आंदोलनाची घोषणा केली आहे. तसेच या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

येत्या 17 डिसेंबर रोजी महाविकास आघाडीकडून हा मोर्चा काढला जाईल. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा भव्य मोर्चा निघणार आहे. राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मविआची बैठक पार पडली. याच बैठकीमध्ये या मोर्चाविषयी चर्चा झाली. महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात हा मोर्चा असेल. तसेच न भुतो न भविष्यती असा हा मोर्चा असेल असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘हा लढा राजकीय नसून राज्यासाठी असणार आहे. केवळ राज्यपालांना हटवावे हाच मुद्दा या आंदोलनात नसणार आहे. तर यासोबतच राज्याचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात हा मोर्चा असेल. या लोकांचा विरोध करण्यासाठी हा मोर्चा म्हणजे एक सुरुवात असेल. यानंतर पुढील पाऊल टाकले जाईल.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -