महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद गेल्या अनेक दिवसापासून चिघळला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काही दिवसांपूर्वी खळबळजनक वक्तव्य केलं होतं. सांगली व सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यावर आणि काही गावांवर आपला दावा सांगितला होता. त्यानंतर राज्यभर या सीमावदाचे पडसाद दिसून आले होते. काही दिवस बस बंद ठेवण्यात आल्या. अशावेळी राष्ट्रावादीचे यंग नेते रोहीत पवार चक्क कर्नाटक राज्यातील बेळगावतील चेनम्मा चाैकात पोहचले आहेत. त्यांनी ट्विट करत ही माहिती देताना म्हटले आहे, राणी चेनम्मा चौक… हीच ती जागा… ज्या ठिकाणी १ जून १९८६ रोजी…
अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार कर्नाटकच्या दौऱ्यावर गेले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सध्या बेळगावात आहेत. बेळगावमध्ये जात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आहे. त्यानंतर त्यांनी चळवळीचे केंद्रस्थान असलेल्या येळ्ळूर गावास भेट देऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले आहे. या दौऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.