ताजी बातमी ऑनलाइन टीम
आगामी अर्थसंकल्प 2023-24 साठीची तयारी जोरात सुरु आहे. त्यासाठी अवघे दोन महिने उरले आहेत. अर्थसंकल्प आला की सर्वात पहिले मागणी होते ती, कर सवलतीची मर्यादा वाढविण्याची. कर सवलत मर्यादा दुप्पट करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात तरी दुप्पट कर सवलत मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्र सरकारवर कर्मचाऱ्यांचाच नाही तर औद्योगिक संघटनांचाही दबाव आहे. त्यामुळे आयकर सवलत वाढण्याची शक्यता आहे.
इंडस्ट्री बॉडी एसोचॅमने कर सवलतीची वकिली केली आहे. येत्या अर्थसंकल्पात कर सवलत देण्याची मागणी संघटनेने केली आहे. सध्याची 2.5 लाख रुपयांची कर सवलत 5 लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची विनंती संघटनेने केली आहे. भारतातील कर्मचारी संघटना आणि करदात्यांनी हीच मागणी केली आहे.
सध्या करदात्यांना 2.5 लाख रुपयांची कर सवलत मिळते. या रक्कमेवर कर लागत नाही. तर ज्येष्ठ नागरिकांना 3 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. तर सर्वात ज्येष्ठ नागरिकांना, 80 वर्षांवरील नागरिकांना सध्या 5 लाख रुपयांची सूट मिळते.
एसोचॅमचे अध्यक्ष सुमंत सिन्हा यांनी माहिती दिली. त्यानुसार, स्टील आणि सिमेंटच्या क्षेत्रात येत्या काही दिवसात तेजी येईल. या क्षेत्रातील कंपन्या त्यांच्याच क्षमतेत वाढ करण्याची योजना आखत आहेत. सध्या जागतिक बाजारात मंदीची आशंका आहे. त्यामुळे व्यापार प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम जीडीपीवर होऊ शकतो.
एसोचॅमने अर्थसंकल्पापूर्वी त्यांच्या शिफारशी केल्या आहेत. त्यात आयकर सवलत वाढविण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही सवलत 5 लाख रुपयांपर्यंत देण्याची शिफारस करण्यात आली आहे. ग्राहकांच्या हाती मोठी रक्कम उरावी यासाठी ही शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांची क्रयशक्ती वाढणार आहे.
करदात्यांसाठी खूशखबरी! प्राप्तिकरात 5 लाखापर्यंत मिळू शकते सूट?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -