Saturday, November 23, 2024
Homeक्रीडालिओनेल मेस्सीचे स्वप्न साकार! अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा जिंकला फिफा विश्वचषक

लिओनेल मेस्सीचे स्वप्न साकार! अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा जिंकला फिफा विश्वचषक

पेनल्टी शूटआऊटमध्ये गतविजेत्या फ्रान्सचा 4-2 असा पराभव करून अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकला आहे. अर्जेंटिनाने 1986 नंतर प्रथमच हे विजेतेपद पटकावले आहे. आता लिओनेल मेस्सीच्या नावावर फिफा विश्वचषकाचे विजेतेपदाची देखील नोंद झाली आहे. दिएगो मॅराडोनानंतर फिफा विश्वचषक जिंकणारा तो अर्जेंटिनाचा पहिला कर्णधार ठरला आहे.

रविवारी कतार येथे खेळल्या गेलेल्या फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात 90 मिनिटे उलटूनही विजेत्यासंघाचा निर्णय होऊ शकला नाही. कारण दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते. यानंतर 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ खेळवण्यात आला आणि तेथेही अर्जेंटिना आणि फ्रान्स 3-3 असे बरोबरीत राहिले. मात्र यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने गतविजेत्या फ्रान्सचा 4-2 असा पराभव करत तिसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकला.

पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाकडे 2-0 अशी आघाडी होती. लिओनेल मेस्सीने (Lionel Messi) 23व्या मिनिटालाच पेनल्टीवर गोल करत अर्जेंटिनाचे खाते उघडले. अर्जेंटिनासाठी मेस्सीचा हा 97 वा गोल ठऱला. यानंतर एंजल डी मारियानेही (Angel Di Maria) 36व्या मिनिटाला गोल करून अर्जेंटिनाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या हाफमध्ये 0-2 ने पिछाडीवर असताना कायलियन एमबाप्पे फ्रान्सचा मसिहा बनला आणि त्याने 79व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केल्यानंतर पुन्हा 81व्या मिनिटाला गोल करून फ्रान्सला 2-2 अशी बरोबरी साधून दिली.

त्यानंतर अतिरिक्त 30 मिनिटांच्या खेळात पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते आणि दुसऱ्या हाफमध्ये मेस्सीने गोल केला. अर्जेंटिनासाठी मेस्सीचा हा 98 वा आणि या फिफा विश्वचषकातील 8 वा गोल होता. यानंतर कायलियन एमबाप्पेनेही पेनल्टीवर गोल करत आपली हॅटट्रिक पूर्ण केली आणि दोन्ही संघ पुन्हा 3-3 अशा बरोबरीत आले. यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने गतविजेत्या फ्रान्सचा 4-2 असा पराभव करून तिसऱ्यांदा फिफा विश्वचषक आपल्या नावावर केला.

लिओनेल मेस्सी आणि डी मारिया यांनी 2008 मध्ये अर्जेंटिनासाठी एकत्रितपणे ऑलिम्पिक फायनल जिंकले होते आणि आता त्यांनी 2022 मध्ये फिफा विश्वचषकाचे विजेतेपद देखील जिंकले आहे. या सामन्यात अर्जेंटिना सहाव्यांदा आणि फ्रान्स चौथ्या वेळेस फायनल खेळले. अर्जेंटिना 2014 मध्ये जर्मनीकडून अंतिम फेरीत हरले होते तर फ्रान्सने 2018 मध्ये क्रोएशियाचा पराभव करून फिफा विश्वचषक जिंकला होता. अर्जेंटिनाचा 35 वर्षीय मेस्सीने पहिल्यांदाच फिफा विश्वचषक जिंकला. मेस्सी आता त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -