Sunday, September 8, 2024
Homeराजकीय घडामोडीआमदार, चिन्ह अन् आता शिवसेनेच्या पक्ष कार्यालयावरही शिंदे गटाचा ताबा

आमदार, चिन्ह अन् आता शिवसेनेच्या पक्ष कार्यालयावरही शिंदे गटाचा ताबा

शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ झालेली पाहायला मिळाली. ज्यामध्ये शिवसेनेला सर्वाधिक फटका बसला. राज्यात सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावे लागलेच. सोबतच पक्षातील 40 आमदारही गेले.

यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेचे पक्ष चिन्हही गोठवण्यात आले तसेच शिवसेना पक्षही ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन गटात विभागला गेला. आता पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शिवसेनेचे कार्यालयही शिंदे गटाकडे गेले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरमध्ये पार पडत आहे. या अधिवेशनासाठी राज्यभरातील नेते, मंत्री नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. २०१९ नंतर पहिल्यांदाच हे अधिवेशन नागपूरात पार पडत आहे. याआधी शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात मोठा बदल करण्यात आला आहे.

शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात देण्यात आले आहे. आमदारांची संख्या पाहता हा बदल करण्यात आला आहे. तसेच ठाकरे गटातील आमदारांसाठी संभाव्य व्यवस्था करण्यात आली आहे.

शिवसेनेचे कार्यालय सोडण्याची वेळ आली तेव्हा कार्यालयातील कर्मचारी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. वर्षानुवर्ष काम करत असलेल्या महिलांच्या डोळ्यात यावेळी अश्रु तरळले होते. दरम्यान 19 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर असं हे 10 दिवसीय अधिवेशन भरणार आहे. यंदाचं अधिवेशन वादळी असणार यात शंका नाही. कारण शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर नागपुरात होणारं हे पहिलं अधिवेशन आहे.

याआधीच्या पावसाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे कुठले मुद्दे उपस्थित करणार हे पाहणं महत्वाचं असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -