पुढील काही दिवस राज्यातील काही जिल्ह्यात थंडी वाढणार असून लोकांना थंडीमुळं हुडहुडी भरणार आहे. थंडीमुळे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक तसेच अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जिल्ह्यात २३ ते २७ डिसेंबरदरम्यान पाच दिवस थंडीची तीव्रता अधिक जाणवू शकेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
हिवाळी मौसम सुरु झाला असल्या तरी देखील अजून म्हणावी तशी थंडी पडली नाही, ग्रामीण भागात थंडी कायम असली तरी शहरी भागात म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण आदी भागात थंडी जोर कमी आहे. त्यामुळं थंडीतही गर्मीचा अनुभव मुंबईकरक घेत आहेत, मात्र शुक्रवारपासून राज्याच्या काही भागांत थंडीचा कडाका जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागान व्यक्त केला आहे. त्यामुळं राज्यातील काही जिल्ह्यात थंडीचा कडाका पुढील काही दिवस असणार आहे.
दरम्यान, पुढील काही दिवस राज्यातील काही जिल्ह्यात थंडी वाढणार असून लोकांना थंडीमुळं हुडहुडी भरणार आहे. थंडीमुळे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक तसेच अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जिल्ह्यात २३ ते २७ डिसेंबरदरम्यान पाच दिवस थंडीची तीव्रता अधिक जाणवू शकेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. उर्वरित महाराष्ट्रात थंडी असेल पण तीव्रता काहीशी कमी जाणवेल, त्यामुळं वरील जिल्ह्यात थंडीचा कडाका पुढील काही दिवस असणार आहे. मध्य महाराष्ट्रात सध्या १३ ते १७ अंशांदरम्यान किमान तापमानाची नोंद होत आहे. जळगाव, महाबळेश्वर येथे मंगळवारी किमान तापमान सोमवारपेक्षा अधिक होते. मराठवाड्यामध्येही औरंगाबाद वगळता इतर ठिकाणी १३ ते १५ अंश सेल्सिअसदरम्यान किमान तापमानाची मंगळवारी नोंद झाली.
तापमानाचा पारा पुन्हा घसरणार असून, डिसेंबर अखेरीस पुन्हा एकदा थंडीची जाणीव होण्याची शक्यता आहे. काश्मीर खोरे, हिमाचलमधील अतिथंडी आणि बर्फवृष्टीमुळे पश्चिम राजस्थानच्या वायव्य दिशेकडून सह्याद्री आणि सातपुडा खिंडीतून उत्तर महाराष्ट्रात थंडीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये यवतमाळमध्ये सरासरीहून किमान तापमान ३ अंशांनी कमी नोंदवले गेले आहे. त्यामुळं राज्यातील काही जिल्ह्यात थंडीचा कडाका पुढील काही दिवस असणार आहे.