नागपूरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांनी विधानसभेच्या अध्यक्षांबाबत अपशब्द वापरले होते, यामुळे हे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत जंयत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे.
आजच्या कामकाजात जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरल्यामुळे निलंबनाची कारवाई मागणी व्हावी अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली होती, त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादीच आमदार यांनी नागपूर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केलं आहे. यानंतर विरोधकांनी अधिवेशनातून सभागृहाचा त्याग (वॉकआऊट) केलं आहे.