Tuesday, December 24, 2024
Homeब्रेकिंगनरेंद्र मोदी यांचा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक!! राम मंदिर निर्मितीनंतर रामसेतूच्या जागेवरही दावा...

नरेंद्र मोदी यांचा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक!! राम मंदिर निर्मितीनंतर रामसेतूच्या जागेवरही दावा ठोकणार?

लोकसभा असो किंवा विधानसभा.. भाजपचं प्लॅनिंगच एवढं जबरदस्त असतं की भल्या भल्यांना धक्के बसतात. राजकीय वर्तुळात अनेकांना हा अनुभव आला असेल. खुद्द देखील मोदींनीदेखील भाजपाच्या मायक्रोप्लॅनिंगबद्दल एकदा भाषणात सांगितलं होतं. आगामी 2024 च्या निवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वात मोठ्या मास्टरस्ट्रोकची माहिती समोर आली आहे. तमिळनाडूतील रामनाथपुरम लोकसभा मतदार संघातून मोदी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

रामेश्वरम हे पवित्र ज्योतिर्लिंग असलेल्या रामनाथपुरम येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार आहेत, असे वृत्त नवभारत टाइम्सने दिले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वडोदरा आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून निवडणूक लढवली होती.

भारताच्या दक्षिण आणि पश्चिम भागात प्रभाव गाजवण्यात यशस्वी झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिणेच्या स्वारीसाठी सज्ज झाल्याचं म्हटलं जातंय.

मोदी काय म्हणाले होते?
2019 च्या लोकसभा निवडणुकांनंतर एका पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, आमच्या योजना साध्या नसतात. शेवटच्या क्षणी निर्णय बदलतो, असं दिसतं. पण ते तसं नसतं. आम्ही खूप डिटेल प्लॅनिंग करतो. गोष्टी आधीच उघड करत नाहीत. तुम्हाला त्या हळू हळू कळतात…. या वक्तव्याचे अर्थ आता कळू लागले आहेत.

उत्तर भारतात नितीश कुमार, सुखबीर बादल आणि इतर लहान पक्षांमुळे जे नुकसान झालंय, ते दक्षिण भारतातून भरून काढण्याचा भाजपाचा विचार आहे.

रामनाथपुरम हा तमिळनाडूतल्या 38 जिल्ह्यांपैकी एक आहे. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचं जन्मस्थळ.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, देवस्थळ आणि द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक रामेश्वरम याच जिल्ह्यात आहे. पौराणिक उल्लेखांनुसार, येथूनच रामसेतूची सुरुवात झाली होती. याच मार्गाने रामाने लंकेवर स्वारी केली होती.

काही दिवसांपूर्वी वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी तमिळ संगमम् हा कार्यक्रमही आयोजित केला होता. रामसेतूच्या मार्गाने मोदी दिल्लीतील महायुद्ध जिंकण्यासाठी निघाले आहेत, असा संदेशही भाजपातर्फे दिला जाऊ शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनाथपुरम येथून निवडणूक लढवली तर उत्तरेत अयोध्येतील राम मंदिर निर्माणानंतर दक्षिणेत रामसेतूपर्यंत मोदींचा दबदबा वाढण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -