Sunday, February 23, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : मुंबई-बंगळूर विमान हायजॅक; 50 प्रवासी ओलीस दोन दहशतवाद्यांचा खात्मा

कोल्हापूर : मुंबई-बंगळूर विमान हायजॅक; 50 प्रवासी ओलीस दोन दहशतवाद्यांचा खात्मा

मुंबईहून बंगळूरला जाणारे विमान दहशतवाद्यांनी शुक्रवारी हायजॅक केले. हे विमान कोल्हापूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.प्राणाची बाजी लावून दहशतवाद्यांशी दोन हात करीत जवानांनी ओलीस असलेल्या 50 प्रवाशांचा जीव वाचविला. दोन दहशतवाद्यांचा खात्मा करून एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले. कोल्हापूर विमानतळावरील मॉक ड्रिलचा हा थरार उपस्थितांनी अनुभवला. तर जवानांनी कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे दाखवून दिले.

मुंबईहून बंगळूरकडे जाणारे विमान तीन दहशतवाद्यांनी हायजॅक केले आहे. विमानात 50 प्रवासी दहशतवादांच्या ओलीस आहेत. कोल्हापूर विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात येणार आहे, असा संदेश कोल्हापूर विमानतळ प्रशासनाकडून पोलिस कंट्रोल रूम व जिल्हा प्रशासनाला सायंकाळी 4वाजून 59 मिनिटाने मिळाला.

संपूर्ण जिल्हा प्रशासन सतर्क होत जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली क्यूआरटी पथक, दंगल नियंत्रण पथक, बॉम्बशोध पथक, पोलिस दल, महाराष्ट्र सुरक्षा बल जवान, एटीएस पथक तसेच अग्निशमन बंब, अ‍ॅम्ब्युलन्स असे सारे विमानतळावर तत्काळ हजर झाले.हायजॅक केलेल्या विमानातील प्रवाशांचे नातेवाईक ‘प्रवाशांचा जीव वाचवा’, अशी गयावया करत रडत होते. दहशतवाद्याकडून हायजॅक केलेले विमान लँडिंग होताच जवानांनी प्राणाची बाजी लावून दहशतवाद्यांशी 45 मिनिटे लढा देत 50 प्रवाशांना सुखरूप ताब्यात घेतल. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला तर एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले. सपोनी अविनाश माने, एटीएसअधिकारी करपे, विमानतळ अधिकारी विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी 5वाजून 58 मिनिटांनी मिशन फत्ते झाले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -