Monday, February 24, 2025
Homeनोकरी३६२८ रिक्त पदांसाठी तलाठी भरती, नवीन GR आला

३६२८ रिक्त पदांसाठी तलाठी भरती, नवीन GR आला

महाराष्ट्र शासनाने काही दिवसापूर्वी तलाठी भरतीसाठी 4122 पदांसाठी मागणी पत्र मागवले होते. दिनांक 07 डिसेंबर रोजी आलेल्या शासन निर्णयानुसार 3110 तलाठी पदे व 518 मंडळ अधिकारी असे एकूण 3628 पदे निर्माण करण्यास आणि त्याची पदभरती करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

ही पदभरती सुद्धा लवकरच केले जाणार आहे, शासन निर्णयानुसार वेगवेगळे विभागात हे पदे असणार आहेत कोणत्या विभागात किती जागा आहेत याचा तपशील खालील प्रमाणे दिला आहे. तलाठी भरतीची जाहिरात तसेच कुठल्या जिल्ह्यात किती रिक्त जागा, कशी होणार भरती प्रक्रियायाची सविस्तर माहिती खालील दिलेली आहे.

पदांचा तपशील

मंडळ अधिकारी – 518 पदे
तलाठी संवर्गाची नव्याने निर्माण करण्यात आलेली – 3110 पदे
एकूण 3628 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

किमान शैक्षणिक पात्रता

उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

विभागानुसार पदसंख्या (एकूण 3628 जागा)

नाशिक – 803 जागा
औरंगाबाद – 799 जागा
कोकण – 641 जागा
नागपूर – 550 जागा
अमरावती – 124 जागा
पुणे – 702 जागा

महसूल विभागनिहाय तलाठी गट क संवर्गाच्या भरावयाच्या पदाचा तपशील शासन निर्णयामध्ये आहे. विवरणपत्र अ मधील तलाठी गट क संवर्गातील पदांबाबत मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू निमावली प्रमाणित करून, त्या संदर्भातील सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षणनुसार तपशील सोबत जोडलेल्या विवरणपत्र ब प्रमाणे जिल्हानिहाय माहिती कोणत्याही परिस्थितीत 15 दिवसात शासनास पाठवण्यात यावी असा आदेश देण्यात आला आहे.

किमान वयोमर्यादा

१८ वर्षे ते ३८ वर्षे.
मागासवर्गीय/खेळाडू-०५ वर्षे सूट
प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त उमेदवार/अपंग – ०७ वर्षे सूट

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -