Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगधारदार हत्याराने अल्पवयीन युवकाचा खून; घटनेनं खळबळ

धारदार हत्याराने अल्पवयीन युवकाचा खून; घटनेनं खळबळ

वाई येथील सिद्धनाथवाडी परिसरात एका अल्पवयीन युवकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धारदार हत्याराने वार करून हा खून कऱण्यात आलाय. घटनास्थळी पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक दाखल झालं असून पुढील तपास चालू आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मयत झालेल्या युवकाचे नाव न्यास शिवाजी खरात (वय साडेसतरा वर्षे) असून तो पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता . न्यास खरात याचे कोणाशीही वैर नसल्याचं सांगण्यात आलं आहे. तरीही त्याचा धारदार हत्याराने खून करण्यात आला आहे. घटनेची माहिती शहर व परिसरात पसरताच सिद्धनाथवाडी ग्रामस्थांनी गर्दी केली असून नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे.

दरम्यान, खून झाल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी डीवायएसपी शितल जानवे खराडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, उप निरीक्षक स्नेहल सोमदे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सर्व कर्मचारी आणि इतर पोलीस कर्मचारी पोहोचले. याशिवाय फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झालं असून पुढील तपास चालू आहे. न्यास खरात याचा खून कोणत्या कारणाने झाला याचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -