Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : रंकाळ्याजवळ जेसीबीखाली सापडून महिला ठार

कोल्हापूर : रंकाळ्याजवळ जेसीबीखाली सापडून महिला ठार

जेसीबीची दुचाकीला धडक बसल्याने जेसीबीच्या खाली सापडून महिला जागीच ठार झाली आहे. अनुराधा मिलींद पोतदार (वय 46 रा. फुलेवाडी 4 था बस स्टॉप), असे मृत महिलेचे नांव आहे. तर पती मिलींद पोतदार हे जखमी झाले. शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास जावळाच्या गणपती मंदिरनजीक हा अपघात घडला. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोतदार कुटुंबीय फुलेवाडी 4 था बस स्टॉप येथे राहतात. अनुराधा या दसरा चौक परिसरातील एका दवाखान्यात रिसेप्शनिस्ट म्हणून तर मिलींद उद्यमनगर येथे खासगी कंपनीत कामास आहेत. शनिवारी सकाळी दोघेही एकाच दुचाकीवरुन कामावर जाण्यास निघाले होते. रंकाळा डी मार्टपासून काही अंतरावर ते आले असता रस्त्यावरुन जाणाऱ्या जेसीबीच्या पुढील बकेटची धडक पोतदार यांच्या दुचाकीला बसली. यामध्ये मिलींद काही अंतर दुचाकीसह फरफटत गेले. तर अनुराधा पोतदार या जागीच पडल्या. त्यांच्या अंगावरुन जेसीबीचे मोठे चाक गेले. यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. पती मिलींद यांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी सिपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या पश्च्यात मुलगा, पती असा परिवार आहे. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली. दरम्यान जेसीबी चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. त्याचा शोध सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -