टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात गुवाहाटीमध्ये 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. रोहितच्या घरातील जवळच्या सदस्याचं निधन झालं आहे. रोहितची पत्नी रितीकाने इंस्टाग्राम पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. रितीकाने या इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्या सदस्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. तसंच माझं पहिलं प्रेम , माझं पहिलं बाळ, असं म्हणत ही पोस्ट शेअर केली आहे.
रोहितच्या घरातील श्वानाचे अर्थात कुत्र्याचं निधन झाल्याची माहिती रितीकाने इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. हल्ली प्रत्येक घरात पाळीव प्राणी पाळले जातात. कुत्री-मांजर अशी पाळीव प्राणी सर्रासपणे माणसांसोबत राहतात. हे प्राणी माणसांपेक्षा जास्त लळा लावतात. त्यांना जरी बोलता येत नसलं तरी ते त्यांच्या हालचालीतून आपलं प्रेम दाखवून देतात. कधी शेपूट हळवून तर कधी उडी मारुन ते आपलं प्रेम व्यक्त करुन दाखवत असतात. यामुळे ते प्राणी घरातील सदस्याप्रमाणेच वाटू लागतात. मात्र एका दिवशी अचानक त्या प्राण्याचा मृत्यू होतो. रोहितच्या घरातील कुत्र्याचंही असंच मृत्यू झाल्याने शर्मा कुटुंबिय हे दुखा:त आहेत.
रितीकाने पोस्टमध्ये काय म्हटलंय?
कुत्र्याच्या मृत्यूमुळे रितीका अतिव दु:ख झालंय. रितीकाने आपल्या कुत्र्याबाबत लिहिताना माझं पहिलं प्रेम, माझं पहिल बाळ, असं म्हटलंय. यावरुन शर्मा कुटुंबियांना कुत्र्यासोबत किती लळा होता, हे स्पष्ट होतं.
रितीकाची भावूक पोस्ट
दरम्यान कॅप्टन रोहितने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या सामन्यात शानदार सुरुवात केली. त्याने शुबमन गिलसोबत शतकी सलामी भागीदारी केली. रोहितने नववर्षात अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर त्याने आपला धमाका सुरुच ठेवला. हिटमॅनच्या चाहत्यांना त्याच्याकडून शतकाची अपेक्षा होती. त्यानुसार रोहित खेळतही होता. मात्र रोहित 83 धावांवर आऊट झाला आणि चाहत्यांची निराशा झाली. रोहितने 123.68 च्या स्ट्राईक रेटने 67 बॉलमध्ये 3 कडक सिक्स आणि 9 चौकारांसह 83 धावांची खेळी केली.