Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रआता ‘या’ शहराचं नाव बदलणार? लवकरच होणार मागणी..

आता ‘या’ शहराचं नाव बदलणार? लवकरच होणार मागणी..

राज्यात अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा काही दिवसांपूर्वीच उपस्थित झाल्यानंतर अजून एका शहराच्या नामांतराचा मुद्दा आज सकाळीच आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित करून राजकारणात शहरांच्या नामांतराचा प्रश्न चालू ठेवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ‘पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करा’, अशी मागणी केली आहे. एवढंच नाही तर ही राज्यातील शिवभक्तांची इच्छा असल्याचं देखील त्यांनी ट्विट केलं आहे. तसेच ते म्हणाले की, येत्या विधिमंडळ अधिवेशनात पुणे शहराचे नामांतर करण्यासाठी राज्य सरकारला साकडे घालणार आहे, असं ते म्हणाले.

सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे केले आहे. त्यानंतर अहमदनगर आणि आता राज्यातील पुणे शहराच्या नामांतरप्रकरणी अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनी पुणे शहराच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित केला असता अनेक ट्विटर यूजर्सनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आमदार अमोल मिटकरी म्हणाले..

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, “पुणे शहराचे नामकरण ‘जिजाऊ नगर’ व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार”, असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान राज्यात होणाऱ्या मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह जवळपास 18 महापालिकांच्या निवडणुकांच्या तोंडावर राज्यातील अनेक शहरांच्या नामांतराचा मुद्दा आणि त्याच्यावरून श्रेय कोणी घ्यावे, यावरून वाद वाढण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यातील या मोठ्या शहरांमध्ये विकासावर कोणी का बोलत नाही, अशा प्रतिक्रिया ट्विटर युजर्स आणि नागरिक देत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -