Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात अग्नितांडव…; गोकुळ शिरगाव MIDC मधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये आग!

कोल्हापुरात अग्नितांडव…; गोकुळ शिरगाव MIDC मधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये आग!

ताजी बातमी ऑनलाइन टीम

कोल्हापुर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव एमआयडीसी (MIDC) मधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये असलेल्या शेरा प्लस केमिकल कंपनीला तीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली आहे. आगीमुळे धुरांचे लोट परिसरात पसरू लागले आहेत. दरम्यान अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर शहरालगत गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्या आहेत. या ठिकाणी असलेल्या सेराफ्लेक्स युनिटमध्ये केमिकल कंपनी आहे. दुपारी अचानक या कंपनीला आग लागली. कंपनीतून धुरांचे लोट बाहेर येऊ लागल्याने कंपनीतील कर्मचारी बाहेर पडले.

याबाबत तत्काळ प्रशासनास माहिती देण्यात आली असून कोल्हापूर महापालिका, कागल महापालिकेच्या चार ते पाच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल आहेत. केमिकल कंपनीत आग लागल्याने इतर कंपन्यांकडे आग पसरू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासनाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -