भारतीय डाक विभाग, कोल्हापूर येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विमा प्रतिनिधी पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.
संस्था – भारतीय डाक विभाग, कोल्हापूर
भरले जाणारे पद – विमा प्रतिनिधी / Insurance Representative
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- उमेदवार 10 वी पास/ मान्यताप्राप्त मंडळाद्वारे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव , संगणकाचे ज्ञान व स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असणे अपेक्षित आहे.
वय मर्यादा – 18 ते 50 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर (महाराष्ट्र)
आवश्यक कागदपत्रे –
बायोडाटा
आधार कार्ड
पॅन कार्ड
जन्मतारखेचा पुरावा
शैक्षणिक प्रमाणपत्र
फोटो
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 31 जानेवारी 2023
मुलाखतीचा पत्ता – मा. अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, रमणमळा, कोल्हापूर – 416003.
अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.inwww.indiapost.gov.in