राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथे महीलेचे दागिने पॉलिशच्या बहाण्याने दोघा अज्ञातांनी एक तोळ्याचे अंदाजे ३५ हजार रूपये किंमतीचे साखळीसह मंगळसूत्र लंपास केले आहे. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेमूळे गावात खळबळ उडालीय. सोने चांदी पॉलिसच्या बहाण्याने आलेल्या लोकांवर विश्वास ठेऊन सोने देऊ नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
कसबा वाळवे ग्रामसचीवालयाच्या मागील गल्लीत आज सकाळी दोघे यूवक कोणाचे दागिणे पॉलिश करायचे आहेत का ? अशा आरोळ्या देत होते. यावेळी आश्विनी अनंत आरेकर यांनी या दोघांच्याकडे चांदीची जोडवी पॉलिश करण्यासाठी दिले. त्यांनी ते पॉलिशकरून दिल्यानंतर अजून काही दागिने पॉलिशकरायचे आहेत का अशी विचारणा त्यांनी आश्विनी आरेकर यांच्याकडे केली. त्यानंतर तिने एक तोळ्याचे मंगळसूत्र पॉलिशकरण्यासाठी दिले.त्यानी या मंगळसूत्राची पूङी बांधून आपल्या खिशात ठेवली आणि खिशातील दगड बांधलेली पुडी आश्विनी आरेकर यांची मूलगी वैष्णवी अनंत माने यांच्याकडे दिल्यानंतर त्या दोघांनी तेथून पळ काढला.
यावेळी वैष्णवी हिने ती पुडी उघडून पाहील्यानंर तिला दगड आढळून आले,फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तो पर्यंत हे दोघे जण कॉलनीमार्गे पळून गेले.याबाबतची माहीती राधानगरी पोलिसानां दिल्यानंतर लगेच घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी त्या परिसरात असणाऱ्या सी.सी. टिव्ही फूटेजची पाहाणी केली.पण त्यामध्ये ते दोघे चोर आढळून आले नाहीत. या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे. अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहे.




