ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे सिरीजचा शेवटचा सामना 24 जानेवारी म्हणजेच मंगळवारी खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने आधीच 2 सामने जिंकल्यामुळे सीरिजवर भारताचा कब्जा आहे. इंदूरमध्ये तिसरा आणि शेवटचा सामना खेळवण्यात येणार असून या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला. भारतीय टीमचा स्टार फलंदाज विराट कोहली दुसऱ्या वनडेमध्ये दुखापतग्रस्त झाला आहे.
टीम इंडियाचा किंग कोहली दुसऱ्या वनडे सामन्यात फिल्डींग करताना दुखापतीग्रस्त झाला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ग्लेन फ्लिप्सने कव्हर डाईव्हवर शॉट मारला. हा शॉट रोखण्यासाठी विराटने उंच उडी घेतली, जेणेकरून तो बॉल थांबवू शकेल. यामध्ये बॉल थांबला नाही, मात्र विराट कोहली एंजर्ड झाला आहे.
फिल्डींगदरम्यान दुखापत झाल्यानंतर विराट कोहली ड्रेसिंग रूममध्ये परतला होता. यावेळी फिजीओने त्याच्या हातावर पट्टी देखील बांधली. मात्र दुखापत असूनही तो पुन्हा मैदानावर उतरला होता. त्यामुळे तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात विराट कोहलीला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.