Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर: मनोरुग्ण मुलाकडून वडिलांचा खून, खुरप्याने केले सपासप वार

कोल्हापूर: मनोरुग्ण मुलाकडून वडिलांचा खून, खुरप्याने केले सपासप वार

बहिरेवाडी (ता .आजरा) येथील मनोरुग्ण असणाऱ्या मुलाने आई-वडिलांवर खुरप्याने केलेल्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली आहे. कृष्णा बाबू गोरुले (वय ६५) असे मृताचे नाव असून आई पारुबाई कृष्णा गोरुले (६०) या गंभीर जखमी आहेत.सचिन कृष्णा गोरुले (३२) हा मनोरुग्ण असून रात्री उशिरा आजरा पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, कृष्णा गोरुले यांचे भैरवनाथ हायस्कूलच्या बाजूला घर आहे. तेथे सचिन हा आई वडिलासोबत रहातो. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्याचे आई-वडिलांशी भांडण काढले. यावेळी घरात असणाऱ्या खुरप्याने आईला मारहाण करत जखमी केले. त्या ओरडत घराबाहेर आल्या असता वडील कृष्णा गोरुले यांच्यावर सचिनने खुरप्याने सपासप वार केले.

खुरप्याचा वार वर्मी बसल्याने कृष्णा हे रक्ताच्या थारोळ्यात खोलीत पडले. पारुबाई यांचा आरडाओरड ऐकून घराकडे ग्रामस्थांनी धाव घेतली असता कृष्णा गोरुले हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सचिन हा पुन्हा बाहेर येऊन मारहाण करेल म्हणून ग्रामस्थांनी घराच्या बाहेरून कड्या लावून बंद केले. पारुबाई यांना रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे नेण्यात आले. मात्र अधिक उपचारासाठी कोल्हापूरला हलवले.

महालक्ष्मी यात्रेचा जागर असल्याने मुलाने वडिलांना ठार मारल्याचे वृत समजताच घटनास्थळी मोठी गर्दी समजली होती. पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी घटना स्थळी भेट दिली असता घराच्या पाठीमागील बाजूचा दरवाजा उघडून प्रवेश केला. सचिन हा घरातील वरच्या माळ्यावर होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर आई-वडिलांना मारहाण केल्याचे कोणतेही दडपण त्याचेवर नव्हते.

सचिन याचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता, मात्र तो मनोरुग्ण स्थितीत वावरत असल्याने त्यांन पत्नीपासून तीन वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला होता. वेडाच्या भरात त्याने खुरप्याच्या साह्याने आई-वडिलांवर वार केला. सचिनच्या हातात खुरपे असल्याने वडिलांना मारू लागला त्यातच ते मृत्युमुखी पडले. सचिन हा घरातून बाहेर पडून इतरांना मारेल म्हणून घराचे पाठीमागील व पुढचे दरवाजे बंद केले अन्यथा अनेकांचा जीव गेला असता.

महालक्ष्मी यात्रेसाठी शेतकरी सेवा मंडळाने गावात डिजिटल फलक केले होते. त्या फलकावर कृष्णा गोरुले यांचा डिजिटलवर गावात फोटो लावला तो अखेरचा ठरला. मुलाने वडिलांचा खून केल्याने यात्रेस गालबोट लागले.

रात्री उशिरा महालक्ष्मीच्या उत्सव मूर्तीची विधिवत पूजा करून गावातून मिरवणूक काढण्यास सुरुवात केली. यात्रेच्या जागराच्या वेळी गावात आकस्मिक घटना पहिली घडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -