Wednesday, July 30, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ

पुण्यात बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला आहे. टणू गावात शेतकऱ्याला ही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली.

इंदापूर तालुक्यातील टणू गावात एका शेतकऱ्याला आपल्या जनावरांच्या मुक्त संचार गोठ्यामध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. टणू गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दत्तात्रय मोहिते यांच्या जनावरांच्या मुक्त संचार गोठ्यामध्ये ही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली. त्यानंतर या शेतकऱ्यानं पोलिसांच्या 112 ह्या हेल्पलाइनला या संदर्भात माहिती दिली.

माहिती मिळताचं इंदापूर पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक BDD पथक या ठिकाणी दाखल झाले आहे. या श्वान पथकाने ही वस्तू डिटेक्ट केली असून थोड्याच वेळात या ठिकाणी बॉम्ब शोध आणि नाश पथकाची टीम दाखल होणार आहे. त्यानंतर ही वस्तू खरंच बॉम्ब आहे का की अन्य काही आहे याबाबत उलगडा होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -