Tuesday, July 29, 2025
Homeयोजनानोकरी10 वी पास असणाऱ्यांना संधी! CISF मध्ये भरती

10 वी पास असणाऱ्यांना संधी! CISF मध्ये भरती

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण ते या सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

पात्र आणि इच्छुक उमेदवार cisf.gov.in CISF

च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोकरीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू असून ती 22 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेअंतर्गत 451 पदांवर युवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यापैकी 183 पदे कॉन्स्टेबल/ड्रायव्हरची असतील, तर 268 पदे कॉन्स्टेबल (ड्रायव्हरलेस पंप ऑपरेटर) ची असतील. या तरुणांना दरमहा 21,700 रुपये ते 69,100 रुपये पगार दिला जाणार आहे.

वयोमर्यादा : CISF मध्ये भरतीसाठी उमेदवाराचे वय 21 ते 27 वर्षे असावे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत 3 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे, तर एससी-एसटी उमेदवारांना 5 वर्षांची सूट मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता : CISF मध्ये सरकारी नोकरीसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक शिक्षित उमेदवारही या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज कसा करावा?

CISF मधील कॉन्स्टेबल रिक्त जागांसाठी cisfrectt.in

अधिकृत वेबसाइटला भेट द्या
आता लॉगिन लिंकवर क्लिक करा
स्वत: नोंदणी करा आणि नंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करा
अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा
अर्जाची प्रिंटआऊट घ्या
अर्ज शुल्क किती आहे?

जनरल, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
SC,ST प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -