Tuesday, July 29, 2025
Homeयोजनानोकरीएमपीएससी यांच्यामार्फत 'या' पदांच्या रिक्त जागाची भरती! आजच करा अर्ज

एमपीएससी यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागाची भरती! आजच करा अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील गट ब आणि गट क संवर्गातील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 8169 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी पदांच्या ७८ जागा, राज्य कर निरीक्षक पदांच्या १५९ जागा, पोलीस उप निरीक्षक पदांच्या ३७४ जागा, दुय्यम निबंधक (मुद्रांक निरीक्षक) पदांच्या ४९ जागा, दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क) पदांच्या ६ जागा, तांत्रिक सहायक पदाची १ जागा, कर सहायक पदांच्या ४६८ जागा आणि लिपिक-टंकलेखक पदाच्या ७०३४ पदांच्या रिक्त जागा आहेत.

एमपीएससी यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती मोहिमेमध्ये पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर तपशील याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

राज्य शासनाच्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाइट

https://mpsc.gov.in/

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -