भारतीय वायु दलात भरती होवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. भारतीय वायुसेनेद्वारा ‘अग्निवीर वायू भरती’ची अधिसुचना काढण्यात आली आहे. या अधिसुचनेनुसार ही निवड प्रक्रिया 20 मे 2023 पासून सुरू होणार आहे. तर अर्ज स्वीकारण्यास 17 मार्च 2023 पासून सुरुवात होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.
मंत्रालयाच्या अग्निपथ Recruitment 2023 योजनेअंतर्गत वायू दलातील ही भरती 4 वर्षांच्या काँट्रॅक्टवर होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांपैकी 25 टक्के उमेदवारांना 4 वर्षानंतर कायम स्वरुपी नियुक्त केले जाईल.
अर्ज
भारतीय वायुदलात अग्निवायु म्हणून भरती होऊ इच्छिणाऱ्यांनी IAF अग्निवीर वायूच्या अधिकृत वेबसाइटवर agnipathvayu.cdac.in
भरायचा आहे. उमेदवारांना अर्ज प्रक्रियेअंतर्गत प्रथम नोंदणी करावी लागेल आणि नंतर नोंदणीकृत तपशीलांद्वारे लॉग इन करून, उमेदवार त्यांचे अर्ज सबमिट करू शकतील.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- कोणत्याती मान्यताप्राप्त बोर्डातून विझान शाखेत (फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित) आणि इंग्रजीत किमान ५० टक्के गुणांसहित 12 वी पास असणे आवश्यक आहे.
- कमीत कमी 50 टक्क्यांनी इंजिनिअरींग डिप्लोमा
किंवा व्यावसायिक विषयातील किमान 2 वर्षांचा अनुभव
असणारेही अर्ज करू शकतात.
आवश्यक वय मर्यादा –
- दिनांक 26 डिसेंबर 2002 ते 26 डिसेंबर 2006 दरम्यान जन्म झालेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
- यापेक्षा मोठे किंवा लहान इच्छुक उमेदवारांना शारीरिक मापदंड पूर्ण करावे लागतील.