Saturday, July 5, 2025
Homeअध्यात्महालसिध्दनाथ महाराज की जय....आप्पाचीवाडीत घुमला नामघोष, चैत्र यात्रा उत्साहात

हालसिध्दनाथ महाराज की जय….आप्पाचीवाडीत घुमला नामघोष, चैत्र यात्रा उत्साहात


श्री हालसिध्दनाथ महाराज कि जय..हालसिध्दनाथाच्या नावानं चांगभलं…असा अखंड नामघोष…तुतारीचा हुकांर…बासरीचा सुर… ढोल कैताळाचा टीपेला पोहचलेला निनाद…झेंडे, छत्र्या,देवाचे मुखवटे,अब्दागिरी,सर्व मानाचे घोडे,बकरे व कंबरेला ढोल बांधून पुढे सरकणारे भाविक अशा सर्व लवाजम्यासह श्री क्षेत्र आप्पाचीवाडी (ता.चिक्कोडी)येथिल श्री हालसिध्दनाथ देवाची चैत्र यात्रेनिमित्ताने भाव-भक्तीला उधाण आले होते.

यावेळी निघालेला विलोभनीय पालखी सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागातील हजारो भाविक दाखल झाले होते. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी ही चैञयाञा भरते.हालसिध्दनाथांच्या नावानं चांगभलंचा अखंड नामघोषात तल्लीन होऊन भाविकांनी नाथांच्या पालखी दर्शनासाठी गर्दी केली होती.

सकाळपासूनच सिमाभागातील कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले होते.पालखी सोहळा आणि नाथांच्या दर्शनाने तृप्त होवून ते रात्री उशिरापर्यंत घरी परतत होते. खडक मंदिर परिसरातील आसमंत पिवळा धमक खडक मंदिर सभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पालखी बाहेर पडताच भाविकांनी पालखीवर लोकर, खारीक,खोबरे तसेच मोठ्या प्रमाणावर भंडार्याची उधळण केली. यामुळे खडक मंदिर परिसरातील आसमंत पिवळा धमक झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -