Friday, February 7, 2025
Homeक्रीडाआयपीएलमध्ये आज सामन्यांचा डबल धमाका, 'हे' चार संघ आमने-सामने

आयपीएलमध्ये आज सामन्यांचा डबल धमाका, ‘हे’ चार संघ आमने-सामने


आज आयपीएल 2023 (IPL 2023) मधील पहिली डबल हेडर मॅच म्हणजेच दोन सामने रंगणार आहेत. पहिला डबल हेडर सामना पंजाब आणि कोलकाता तर दुसरा डबल हेडर सामना दिल्ली आणि लखनौ यांच्यात होणार आहे. आयपीएलच्या 16 व्या हंगामाला 31 मार्चला सुरुवात झाली आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला. यामध्ये गुजरातने चेन्नईवर पाच विकेट्सने विजय मिळवला. आज आयपीएलचा दुसरा सामना पंजाब किंग्स आणि कोलकाता यांच्यात होणार आहे. तर, तिसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ यांच्यात होणार आहे. आज शानदार शनिवार ठरणार असून यंदाच्या आयपीएलमधील पहिली डबल हेडर मॅच होणार आहे.

आज शनिवारी (1 एप्रिल) आयपीएल 2023 मधील दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे. मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघातील काही खेळाडू दुखापतग्रस्त असल्यामुळे संघाची अडचण वाढली आहेत. यासोबतच दोन्ही संघा नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहेत. पंजाब किंग्स शिखर धवनच्या नेतृत्वात तसेच श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे त्याचा अनुपस्थितीत कोलकाता नाईट रायडर्स संघाची कमान नितीश राणावर असेल. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

लखनौ आणि दिल्लीत मुकाबला

आयपीएलमधील तिसरा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. लखनौ आणि दिल्ली यांच्यातील हा रणसंग्राम लखनौच्या घरच्या मैदानावर होणार आहे. लखनौमधील इकाना स्टेडिअमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या मागील काही सीझनमध्ये दिल्लीच्या संघाने दमदार कामगिरी केली आहे. 2019, 2020 आणि 2021 मध्ये दिल्लीने लागोपाठ प्लेऑफमध्ये दाखली झाली होती. तर, 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ उपविजेता होता. 2022 मध्ये दिल्ली पाचव्या क्रमांकावर होता. दुसरीकडे लखनौ संघाने पदार्पणातच दमदार कामगिरी केली होती. लखनौच्या संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे, एकापेक्षा एक सरस खेळाडूमुळे लखनौ संघाचं पारडही जड दिसत आहे. 

लाईव्ह सामना कुठे पाहाल?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग ‘Jio Cinema’ अॅपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -