आयपीएल 2023 चा काल तिसरा दिवस झाला. सर्वच टीम्सनी आपला एक-एक सामना खेळलाय. आयपीएलच्या चालू सीजनमध्ये घरच्या मैदानावर खेळणाऱ्या टीम्सनी विजय मिळल्याच पहायला मिळालं होतं. अपवाद फक्त राजस्थान रॉयल्सचा. त्यांनी रविवारी सनरायजर्स हैदराबाद टीमला त्यांच्याच घरात हरवलं. रविवारच्या दुसऱ्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमने मुंबई इंडियन्सला आपल्या घरच्या मैदानात चिन्नास्वामी स्टेडियमवर हरवलं. या मॅचनंतर पॉइंट्स टेबलच चित्र स्पष्ट झालय.
राजस्थानने हैदराबादला 72 धावांच्या मोठ्या फरकाने हरवलं. त्यानंतर रविवारी दुसऱ्या सामन्यात विराट कोहली आणि फाफ डु प्लेसीची जलवा पहायला मिळाला. दोघे शानदार इनिंग खेळले. त्या बळावर RCB ने मुंबई इंडियन्सवर आठ विकेट राखून विजय मिळवला. बँगलोरची टीम कोविडमुळे आपल्या घरच्या मैदानावर तीन वर्षांपासून एकही मॅच खेळली नव्हती.
पहिल्या स्थानावर कुठली टीम?
घराबाहेर विजय मिळवारी राजस्थान रॉयल्स पहिली टीम ठरली. त्यांनी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 20 ओव्हर्समध्ये 203 धावा फटकावल्या. 200 धावसंख्या पार करणार राजस्थान सीजनमधला पहिला संघ ठरला. हैदराबाद टीमने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 131 धावा केल्या. राजस्थान टीमला या विशाला विजयाचा फायदा मिळाला. पॉइंट्स टेबलमध्ये ते पहिल्या स्थानावर आहेत. त्यांचे दोन पॉइंट्स आहेत.
दुसऱ्या स्थानावर केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणारी लखनौ सुपर जायंट्सची टीम आहे. त्यांनी आपल्या पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला. तिसऱ्या नंबरवर आरसीबी आहे. चौथ्या नंबरवर गुजरात टायटन्सची टीम आहे. पाचव्या स्थानावर शिखर धवनची पंजाब किंग्स आहे. या सर्व टीम्सना एक मॅच जिंकल्यानंतर दोन-दोन पॉइंट्स मिळाले आहेत. नेट रनरेटच्या फरकामुळे कुठली टीम एक नंबरला तर दुसरी टीम दोन नंबरला आहे.