Monday, July 28, 2025
Homeयोजनानोकरी10वी पास उमेदवारांना या ठिकाणी नोकरीची संधी; इथे करा अर्ज

10वी पास उमेदवारांना या ठिकाणी नोकरीची संधी; इथे करा अर्ज

10वी पास उमेदवारांसाठी पुण्यात नोकरीची संधी आहे. मुख्यालय दक्षिणी कमांड, पुणे येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. एकूण 78 जागांवर होणाऱ्या या भरती अंतर्गत सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’ हे पद भरले जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 07 मे 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – मुख्यालय दक्षिणी कमांड, पुणे
पद संख्या – 78 पदे
भरले जाणारे पद – सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

1. उमेदवाराने 10 वी किंवा समतुल्य शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
2. उमेदवाराकडे खाजगी शाखा एक्सचेंज (PBX) बोर्ड हाताळण्यात प्रवीणता असणं आवश्यक आहे.
3. सदर उमेदवाराला इंग्रजी आणि हिंदी भाषांचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
4. अनुभव असल्यास प्राधान्य.

मिळणारे वेतन – 21,700/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे

1. Resume
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता

प्रभारी अधिकारी, दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट, पुणे (महाराष्ट्र) पिन – 411001

अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -